Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

अखेर ठरलं! प्रेक्षकांचा लाडका भाऊ Riteish Deshmukh चं करणार Bigg Boss Marathi 6 चे सूत्रसंचालन !
Colors Marathi वर Bigg Boss Marathi सिझन ६ चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर, सगळ्या प्रेक्षकांचा एकच प्रश्न पडला होता तो हा की, “या सिझनचे सूत्रसंचालन कोण करणार?” प्रेक्षकांची इच्छा होती की, रितेश देशमुखनेच या सिझनचे होस्टिंग कराव आणि अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. सलमान खानच्या बिग बॉस हिंदीच्या मंचावर त्यांची घोषणा करण्यात आली आहे. Salman Khan ने रितेश देशमुखचे स्वागत बिग बॉस हिंदीच्या मंचावर अगदी “भाऊ” स्टाईलमध्ये केले. त्याने रितेशचा परिचय करतांना सांगितलं की, “बिग बॉस नंतरही मनोरंजन चालूच राहणार आहे, कारण लवकरच बिग बॉस मराठी सुरू होणार आहे, आणि तो घेऊन येणार आहे माझा लाडका भाऊ रितेश देशमुख.”(Riteish Deshmukh)

रितेश देशमुखने सलमान खानला प्रत्युत्तर देताना सांगितले की, “तुम्हाला खूप शुभेच्छा आणि मी रोजच बिग बॉस हिंदी पाहतो. हा सिझन खूप चांगला जात आहे. बिग बॉस मराठी सिझनमध्ये अनेक गुप्त दरवाजे असणार आहेत. काही दरवाजे आनंदाचे, तर काहीतरी शॉकिंग असतील. प्रत्येक दरवाज्यामागे काहीतरी खास असणार आहे.”

Salman Khan ने मागील सिझनचे देखील कौतुक केले आणि नवीन सिझनसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी, रितेश देशमुखने शोमध्ये काही एलिमिनेशनसुद्धा केले आणि सदस्यांशी संवाद साधला.सोशल मीडियावर सलमान आणि रितेश यांच्या मंचावर एकत्र येण्याने उत्साह निर्माण झाला आहे. “दार उघडणार… नशिब पालटणार… भाऊ येणार!” हा सिझन वाजणार, आणि त्याचे रंग लवकरच उलगडतील. हेच वाक्य आता सगळीकडे घुमू लागले आहे. (Riteish Deshmukh)
===============================
================================
सर्वांच्या लाडक्या भाऊ रितेश देशमुख यांचा बिग बॉस मराठी सिझन ६ साठी होस्ट म्हणून सहभाग निश्चित झाल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झाल आहे. सिझनची धमाल आणि गमतीशीर ट्विस्ट, हे सगळ यंदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. बिग बॉस मराठी सिझन ६, लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstarवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.