Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

सांज ये गोकुळी सावळी सावळी..

आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान

KJVMM BOX Collection: हेमंत ढोमेंच्या चित्रपटानं राखला बॉक्स ऑफिसचा गड

“तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नवी मालिका ‘Vachan Dile Tu Mala’ लवकरच भेटीला; अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत ची नवी जोडी येणार भेटीला !

 नवी मालिका ‘Vachan Dile Tu Mala’ लवकरच भेटीला; अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत ची नवी जोडी येणार भेटीला !
Vachan Dile Tu Mala Marathi Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

नवी मालिका ‘Vachan Dile Tu Mala’ लवकरच भेटीला; अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत ची नवी जोडी येणार भेटीला !

by Team KalakrutiMedia 01/12/2025

स्टार प्रवाह आपल्या प्रेक्षकांसाठी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि आकर्षक आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. वाहिनीने चांगल्या कथा, सशक्त पात्रं आणि समाजाशी संबंधित विषयांच्या माध्यमातून एकाच वेळी मनोरंजन आणि सामाजिक संदेश दिला आहे. आता, स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन, प्रेरणादायी मालिका ‘वचन दिले तू मला’ घेऊन येत आहे. ही कथा आहे एका हुशार आणि धाडसी अॅडव्होकेट ऊर्जाची, जी न्याय मिळवण्यासाठी झगडते आहे. तिच्या संघर्षात तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अॅडव्होकेट शौर्य. (Vachan Dile Tu Mala Serial)

Vachan Dile Tu Mala Serial
Vachan Dile Tu Mala Marathi Serial

एक संवेदनशील छेडछाड प्रकरण हाताळताना ऊर्जात्या प्रकरणात निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात उभी राहते. हर्षवर्धन, जो अत्यंत अहंकारी आणि पराभव स्वीकारू न शकणारा आहे, त्याच्या सामर्थ्याला ऊर्जा धैर्याने तोडते. मालिकेतील हा संघर्ष आणि दोघांमधील लढाई प्रेक्षकांना खूप आवडेल.

Vachan Dile Tu Mala Marathi Serial

या मालिकेतून नवीन जोडी अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अनुष्का सरकटे, जी ‘ऊर्जा शिंदे’ या पात्राची भूमिका साकारणार आहे, आणि ती या भूमिकेबद्दल सांगते की, “ही माझ्यासाठी एक अनोखी आणि महत्त्वाची भूमिका आहे. ऊर्जा एक प्रामाणिक वकील आहे, जी आपल्या वडिलांच्या मूल्यांवर ठाम आहे. तिचा संघर्ष आणि तिच्या मनातील न्यायाचा विचार प्रेक्षकांना नक्कीच भावेल.” तर इंद्रनील कामत हा ‘शौर्य जहागिरदार’ या पात्रात दिसणार आहेत, तो या भूमिकेबद्दल म्हणाला की, “स्टार प्रवाहसोबत काम करणं खूप मोठं भाग्य आहे. शौर्य एक प्रेमळ, सज्जन वकील आहे. याआधी अशा प्रकारच्या पात्रात काम केलेलं नाही, त्यामुळे या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे.”(Vachan Dile Tu Mala Serial)

=============================

हे देखील वाचा: अखेर ठरलं! प्रेक्षकांचा लाडका भाऊ Riteish Deshmukh चं करणार Bigg Boss Marathi 6 चे सूत्रसंचालन !

=============================

स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणतात की, “या मालिकेतून आम्ही समाजाशी जोडलेल्या काही महत्वपूर्ण गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘ऊर्जा‘ ही एक साधी, परंतु खूप शक्तिशाली मुलगी आहे, जी आपल्या स्वप्नांप्रती प्रामाणिक आहे. तिच्या जीवनातील यशाची कथा आणि शौर्यच्या साथीत तिचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.” आता प्रेक्षकांना ही मालिका कशी वाटते हे लवकर समजेल. ही नवी मालिका ‘वचन दिले तू मला’ १५ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor anushka sarkate Celebrity Celebrity News Entertainment Indranil Kamat Marathi Serial Star Pravah vachan dile tu mla serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.