डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

Marathi & Bollywood Movie 2025 : वर्षाच्या अखेरीस ‘हे’ चित्रपट होणार रिलीज
बघता बघता २०२५ वर्षही सरत आलं… दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील कलाकारांनी प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन केलं… हिंदीसह साऊथ फिल्म इंडस्ट्रीनेही दर्जेदार कलाकृती देत जागतिक पातळीवर आपलं नाव मोठं केलं… अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘स्काय फोर्स’ (Sky Force) चित्रपटाने जानेवारी २०२५ची सुरुवात झाली… आता डिसेंबर महिन्यात कोणते चित्रपट रिलीज होणार जाणून घेऊयात… (Bollywood Movies 2025)

धुरंधर
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात पॉवर पॅक्ट अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे… त्याच्यासोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, आर.माधवन आणि अर्जून रामपाल झळकणार आहेत… २०२४ मध्ये आलेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात रणवीर दिसला होता परंतु प्रमुख भूमिकेत तो २०२३ मध्ये आलेल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपटात झळकला होता.. त्यामुळे लीड हिरो म्हणून २ वर्षांनी रणवीर सिंग मोठ्या पडद्यावर दिसणार असून धुरंधर चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने केलेली मेहनत ट्रेलरमध्ये दिसून येत आहे…

इक्कीस
भारतीय चित्रपटसृष्टीचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं… वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला… परंतु, सच्चा कलाकार असणाऱ्या धर्मेंद्रंनी शेवटपर्यंत कॅमेऱ्यासमोर काम करण्याची इच्छा पूर्ण केलीच… त्यांचा अभिनेता म्हणून ‘इक्कीस’ (Ikkis Movie) शेवटचा चित्रपट असून २५ डिसेंबर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे… यात जयदीप अहलावत आणि अगत्स्य नंदा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत…

किस किस को प्यार करु २
कपिल शर्मा याची प्रमुख भूमिका असणारा ‘किस किस को प्यार करु २’ चित्रपट १२ डिसेंबर २०२५ ला रिलीज होणार आहे… या चित्रपटात पारुल गुलाटी, आयेशा खान, हिरा वारीना, स्मिता जयकर असे कलाकार दिसणार आहेत….

उत्तर
नव्या पिढीतील आई आणि मुलाची हटके कथा घेऊन ‘उत्तर’ चित्रपट येतोय… रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट १२ डिसेंबर २०२५ ला रिलीज होणार आहे….

मिस यु मिस्टर
सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची प्रमुख भूमिका असणारा ‘मिस यु मिस्टर’ (Miss U Mister) हा मराठी चित्रपट १२ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपवर भाष्य करणारी ही कथा प्रेक्षकांना कशी वाटते हे लवकरच कळेल…

आशा
अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिची प्रमुख भूमिका असणारा ‘आशा’ चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… ग्रामीणी भागातील आशा सेविकांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारित आहे…
================================
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi