Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Reena Roy ने साकारलेली जबरदस्त इच्छाधारी ‘नागीन’ आठवते का?

 Reena Roy ने साकारलेली जबरदस्त इच्छाधारी ‘नागीन’ आठवते का?
बात पुरानी बडी सुहानी

Reena Roy ने साकारलेली जबरदस्त इच्छाधारी ‘नागीन’ आठवते का?

by धनंजय कुलकर्णी 03/12/2025

राजकुमार कोहली यांनी १९७६ साली एक मल्टीस्टारर सिनेमा दिग्दर्शित केला होता चित्रपटाचं नाव होतं ‘नागिन’.  या सिनेमांमध्ये तब्बल सहा नायक होते. इच्छाधारी नागिनची सूड कथा असं या चित्रपटाचे वर्णन करावे लागेल. १९५४ साली ‘नागिन’ नावाचा एक संगीतमय चित्रपट आला होता. प्रदीपकुमार आणि वैजयंतीमाला अभिनित या चित्रपटातील गाण्यांची जादू आज देखील अबाधित आहे. या म्युझिकली हिट सिनेमाला संगीत हेमंतकुमार यांचे होते. पण १९७६  सालचा ‘नागिन’ हा चित्रपट आधीच्या ‘नागिन पेक्षा टोटली वेगळा होता.’ ही एक सूड कथा होती. हा सिनेमा François Truffaut’s १९६८ सालच्या फ्रेंच सिनेमा  The Bride Wore Black, वर आधारीत होता. मूळ कथानक  Cornell Woolrich यांच्या १९४० साली लिहिलेल्या  François Truffaut’ या कादंबरीवर आधारीत होते..हा सिनेमा पाश्चात्य कलाकृतीवर आधारित जरी असला तरी राजकुमार कोहली यांनी या फ्रेंच कथानकाला भारतीय वातावरणात फिट केले. आणि हा चित्रपट बनवला!

या चित्रपटातील शीर्षक भूमिका अर्थात नागिणीची भूमिका रीना रॉय यांनी साकारली होती. रीना च्या सिने कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक म्हणावी लागेल.हा तिचा पहिलाच हिट सिनेमा कारण तोवर आलेल्या तिच्या सिनेमाना फारसे व्यावसायिक यश लाभले नव्हते. ही भूमिका खरतर रीना रॉयला पहिल्यांदा ऑफर झालीच नव्हती. ही भूमिका आधी ऑफर झाली होती मुमताजला. पण या कॅरेक्टर ला नकारात्मक शेड असलेल्याने  ही भूमिका तिने नाकारली. (दुसरे कारण मयूर वाधवानी लग्न करून लंडनला स्थायिक होण्याचा तिचा निर्णय झाल्याने हातातले सिनेमे लवकर संपवत होती.) नंतर ही भूमिका रेखाला ऑफर करण्यात आली परंतु रेखाने देखील ही भूमिका करण्यास नकार दिला. त्यानंतर ही भूमिका रीना रॉय ला ऑफर झाली. रिना रॉय आणि जितेंद्र ही प्रमुख जोडी या चित्रपटात होती. हे दोघेही इच्छाधारी नाग असतात. नागाच्या रूपातील त्यांचा प्रणय चालू असताना नागाची  (जितेंद्र ची)  हत्या चित्रपटातील इतर हिरो कडून होते.मरणाऱ्या नागाच्या डोळ्यात ती मारेकऱ्यांची प्रतिमा पाहते आणि सूडाने पेटलेली इच्छाधारी नागिन (रीना रॉय) त्याचा बदला घेते असं या चित्रपटाचे कथानक होतं!

चित्रपट अतिशय वेगवान आणि थरारक बनला होता. चित्रपटात सुनील दत्त, विनोद मेहरा, कबीर बेदी, फिरोज खान, संजय खान, अनिल धवन  अशी तगडी स्टार कास्ट होती. सोबत मुमताज, रेखा, प्रेमा नारायण, योगिता बाली, प्रेमनाथ ही जबरदस्त कलावंत मंडळी होती. एकूणच या चित्रपटात बारा स्टार कलावंत होते. त्यामुळेच हा सिनेमा मल्टीस्टारर सिनेमाचा बाप ठरला. राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट होता. या सिनेमाचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते आणि सर्व गाणी वर्मा मलिक यांनी लिहिली होती या चित्रपटातील गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक गाणं हे ‘तेरा’ किंवा ‘तेरी’ या शब्दापासून सुरू होणार आहे. (हा एक युनिक प्रकार होता!)

================================

हे देखील वाचा : अभिनेत्री रेखाने नववीत असतानाच का शाळा सोडली?

================================

या चित्रपटातील संगीत बेफाम गाजलं. ‘तेरे संग प्यार मे नही तोडना’ हे गाणं त्यावर्षीचं सुपरहिट गाणं ठरलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बंपर यश मिळाले दीड कोटी बजेट असलेल्या सिनेमाने त्या काळात तब्बल आठ कोटी रुपयांचा बिझनेस केला. राजकुमार कोहली यांनी ऐंशी  च्या दशकात या सिनेमाचा सिक्वेन्स बनवण्याचा विचार केला होता या चित्रपटाचे नाव ठेवले होते ‘लौट आई नागिन’. शत्रुघ्न सिन्हा , कुमार गौरव, रीना रॉय ही स्टार कास्ट होती पण हा चित्रपट काही बनलाच  नाही, ‘नागीन’ च्या प्रचंड यश नन्तर  राजकुमार कोहली यांनी ‘जानी दुश्मन’ हा चित्रपट बनवला या सिनेमाला देखील प्रचंड यश मिळाले. रिना रॉय त्यांची फेवरेट एक्ट्रेस ठरली यानंतर राजकुमार कोहलींच्या प्रत्येक चित्रपटात रीना राय ची भूमिका हमखास असायची. या जबरदस्त भूमिकेसाठी रीना रॉय ला त्यावर्षीचे फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते पण पुरस्कार मात्र अभिनेत्री राखीला तपस्या या चित्रपटासाठी मिळाला! नागिन चित्रपटातील भूमिका नाकारून मुमताज आणि रेखा यांना नंतर खूप पश्चाताप झाला. रेखाने काही वर्षांनी शेषनाग या चित्रपटात नागिणीची भूमिका केली पण त्या भूमिकेला एवढे यश नाही मिळाले.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood retro news bollywood update Classic movies Entertainment Entertainment News Indian Cinema reena roy reena roy movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.