
Farah Khan चा कूक दिलीप चे नशीब चमकणार; ‘या’ प्रसिद्ध रिएलिटी शो मध्ये दिसण्याची शक्यता
Farah Khan गेल्या काही दिवसांपासून यूट्यूब ब्लॉगिंगमध्ये खूपच व्यस्त दिसत आहे. तिच्या व्हिडीओंची लोकप्रियता इतकी वाढली आहे की तिचे व्हिडिओ लगेचच व्हायरल होतात. फराह खान ब्लॉगिंगमधून कोट्यावधी रुपये कमावत आहे, विशेषत: तिचा कूक दिलीपसोबतचा व्हिडीओ सिरीज खूपच लोकप्रिय ठरली आहे. दिलीप आणि फराहची मस्करी लोकांना खूप आवडते आणि त्यांचा मजेदार संवाद प्रेक्षकांना नेहमीच हसवतो. दिलीपला आता एका सेलिब्रिटीसारखी ओळख मिळाल्यामुळे त्याच्या जीवनात मोठे बदल आले आहेत. फराह खानने दीड वर्षांपूर्वी तिच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि आता तिने व्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. आज तिच्या चॅनलवर लाखो लोक फॉलोअर आहेत. तिच्या या चॅनलमुळे दिलीपला देखील मोठा ओळख मिळाला आहे आणि तो आता जाहिरातींसाठीही काम करत आहे.(Farah Khan Cook)

एका चर्चेत फराह खानने सांगितले की, ती चित्रपटांच्या तुलनेत ब्लॉगिंगमुळे जास्त पैसे कमावत आहे. तिने तिच्या कुक दिलीपला देखील या यशात मोठे योगदान दिले आहे, त्याला तिच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये मोठे पैसे मिळतात. पण आता आता दिलीपचे नशीब ही बदलणार आहे कारण आता तो बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फराह खानचा कूक दिलीप बिग बॉस 19 मध्ये सहभागी होणार आहे अशी चर्चा रंगली आहे.

दिलीपची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, लोक आता फराह खानपेक्षा दिलीपला पाहण्याची जास्त उत्सुकता दाखवतात. फराह खान एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी गेली की, लोक सर्वप्रथम दिलीपला विचारतात, मग फराहला. आणि आता या प्रसिद्धीनंतर दिलीप मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये सामील होण्याची तयारी करत आहे. बिग बॉस 19 मधील सदस्य अभिषेक बजाजसोबत त्याने नवीन ब्लॉग तयार केला आहे. या ब्लॉगमध्ये दिलीपने अभिषेकला बिग बॉसच्या घरातील अनुभवाबद्दल विचारले आणि त्याच्या टिप्स घेतल्या. त्यावेळी फराह खान दिलीपला झाडताना दिसली आणि त्यांच्या मजेदार संवादाने चांगलाच TRP मिळवला.(Farah Khan Cook)
==================================
==================================
आता दिलीप ला ब्लॉगिंगमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आणि तो मोठ्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसणार आहे. हेच त्याचं यश आणि आपल्या मेहनतीचे फलित आहे! पण खरच तो बिग्ग बॉस च्या पुढच्या सीजन मध्ये दिसणार की नाही हे तर आपल्याला नंतरच समजेल.