
Dhurandhar : ३ दिवसांत कमावले १०० कोटी; ५०० कोटी कमावणारा रणवीर सिंगचा हा पहिला चित्रपट ठरणार?
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे… आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे… बॉलिवूडमध्ये यशराज फिल्म्सचं एक स्पाय युनिवर्स (Spy Universe) आहेच; पण त्यालाही टक्कर देणारा हा रिअल लाईफ स्पाय चित्रपट प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधतो… ‘धुरंधर’ने पहिल्याच दिवशी २५ कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार करत नवा इतिहास रचण्याचा मार्ग निवडला होता… जाणून घेऊयात ३ दिवसांत आत्तापर्यंत या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला आहे.

रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘धुरंधर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २८.६० कोटी, दुसऱ्या दिवशी ३३.१० कोटी, तिसऱ्या दिवशी ४४.८० कोटी कमवत देशात ३ दिवसांत १०६.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच, जगभरात या चित्रपटाने १६०.१५ कोटी कमवत नवा इतिहास रचला आहे. महत्वाचं म्हणजे ‘धुरंधर’ हा रणवीर सिंगच्या आजवरच्या सर्व चित्रपटांपैकी सर्वात मोठा ओपनर आणि २०२५ मधला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ओपनर चित्रपटही ठरला आहे. (Dhurandhar Box Office Collection)

‘धुरंधर’ चित्रपटाने २०२५ मध्ये रिलीज झालेल्या हाऊसफुल्ल ५ (९१.८३ कोटी), सिकंदर (८६.४४ कोटी), सैयारा (८४.५ कोटी), कांतारा चॅप्टर १ (७५ कोटी), रेड २ (७३.८३ कोटी), स्काय फोर्स (७३.२ कोटी) आणि सितारे जमीन पर (५७.३ कोटी) या चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनला मागे टाकलं आहे. इतकंच नाही तर ‘धुरंधर’ने ‘रेस ३’, ‘बजरंगी भाईजान’, ‘पीके’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे. वीकेंडला तगडी कमाई करणाऱ्या ‘धुरंधर’ची खरी कसोटी विकडेजमध्ये दिसणार आहे… शिवाय, रणवीरच्या करिअरमधला ५०० कोटींचा टप्पा गाठणारा ‘धुरंधर’ हा पहिला चित्रपट ठरणार का? हे पाहणंही महत्वाचं असणार आहे. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar ने धुरळा केलाय; पण तरीही…
================================
दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त अक्षय खन्ना, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. १९ मार्च २०२६ रोजी ‘धुरंधर’चा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली असून प्रेक्षक पुढच्या भागातील धमाका पाहायला अधिक उस्तुक आहेत. (Dhurandhar Movie Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi