
“आयुष्यात त्यांना कोणीही कमकुवत झालेलं किंवा…”; Hema Malini यांनी चाहत्यांना धर्मेंद्रंच्या अंत्यदर्शनाचं ‘ते’ गुपित सांगितलं
He-Man धर्मेंद्र (Dharmendra) यांचं निधन बॉलिवूड पोरकं करुन गेलं… आणि आपल्या लाडक्या सुपरस्टारला शेवटचं पाहता आलं नाही म्हणून त्यांचे चाहते नाराज झाले… २४ नोव्हेंबर २०२५ रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं आणि त्यानंतर देओल कुटुंबाने गुपचूप त्यांचे अंत्यसंस्कार उरलकले. त्याक्षणापासूनच धर्मेंद्र यांच शेवटचं दर्शन का करु दिलं नाही आणि अंत्यसंस्कार घाईत का उरकले याचं उत्तर अखेर समोर आलं आहे. धर्मेंद्र यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी यावर ता स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. (Entertainment News)
यूएई चित्रपट निर्माते हमद अल रायमी यांच्याशी झालेल्या संभाषणावेळी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यावरचे अंत्यसंस्कार एवढ्या घाईघाईत का उरकले आणि त्यांचं शेवटचं दर्शन कुणाला का करु दिलं नाही याचं कारण सांगितलं आहे. निर्माते हमद अल रायमी यांनी हेमा मालिनींसोबतचा एक फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “शोकाच्या तिसऱ्या दिवशी, मी दिवंगत सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या पत्नी प्रसिद्ध कलाकार हेमा मालिनी यांना भेटायला गेलो. मी त्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटलो. मी त्यांना दुरून अनेक वेळा पाहिलं आहे, पण यावेळी काहीतरी वेगळंच होतं… एक वेदनादायक, हृदयद्रावक क्षण, एक दुःख जे समजण्यापलीकडे आहे, मी कितीही प्रयत्न केले तरी मी ते समजू शकणार नाही… मी त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील अंतर्गत गोंधळ पाहू शकलो, जो त्या लपवण्याचा प्रयत्न करत होत्या… हेमा मला बोलताना म्हणाल्या की, धरमजींना या गोष्टीचं फारच वाईट वाटतंय की, त्यांचे चाहते, त्यांना शेवटचं पाहू शकले नाहीत”. (Hema Malini)

हेमा मालिनींनी पुढे स्पष्ट करत असं देखील म्हटलं की, “धर्मेंद्र यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना कोणीही कमकुवत झालेलं किंवा आजारी पडलेलं पाहावं असं वाटत नव्हतं. त्यांनी अनेकदा त्यांचं दुःख आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींपासून नातेवाईकांपासूनही लपवलंय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर, कुटुंबाला निर्णय घ्यावा लागतो”… हमद यांनी शेवटी लिहिलं, “त्या रडायच्या थांबल्या, आणि स्पष्टपणे म्हणाल्या जे काही झालं ते केवळ दयेच्या भावनेतून करण्यात आले. तुम्हाला त्यांना (धर्मेंद्र) त्या अवस्थेत पाहवले नसते. शेवटच्या काही दिवसांत त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांना प्रचंड वेदना व्हायच्या. त्यांच्या या वेदना बघणे आम्हालाच सहन होत नव्हते”… त्यामुळे आता हेमा मालिनींनी धर्मेंद्रंची शेवटची झलक कुणालाच का दाखवली नाही याबद्दल दिलेल्या स्पष्टीकरणामुळे इतर चर्चांन अखेर पुर्णविराम लागला आहे.
================================
हे देखील वाचा : “तुमच्या मिठीत मला कायम सुरक्षित वाटायचं”; Esha Deol हिची धर्मेंद्रंसाठी भावूक पोस्ट
================================
धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच त्यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ (Ikkis Movie) २५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत जयदीप अहलावत आणि अगत्स्य नंदा झळकणार आहेत. त्यामुळे लवकरच आपल्या सुपरस्टारचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी धरमजींचे चाहते उत्सुक आहेत यात शंकाच नाही.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi