
‘प्रश्न मला नाही, सूरजला विचारा’, Suraj Chavanवर DP दादाचा संताप, व्हिडिओ पोस्ट करत सांगितले कारण…
Bigg Boss Marathi सीझन ५ संपून आता बरेच महिने झाले आहेत पण तरीही त्यातील स्पर्धकांची चर्चा अजूनही होते. या सीजन चा विजेता ठरलेला रीलस्टार सुरज चव्हाण (Suraj Chavan ) नुकताच विवाहबंधनात अडकला, आणि त्याच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, या गृहप्रवेशाच्या आनंदात एका वादाची चर्चा ही चांगलीच रंगत आहे. आणि हा वाद झाला आहे सहस्पर्धक धनंजय पोवार (Dhananjay Powar) ऊर्फ डीपी दादा आणि त्यांच्या सोफासेटवरून झाला. सुरज चव्हाण आणि धनंजय पोवार यांच्यातील संबंध बिग बॉस मराठी ५ दरम्यान मजबूत झाले होते, आणि डीपी दादाने सुरजला वचन दिले होते की त्याच्या नवीन घरासाठी ते एक सोफासेट भेट देणार. मात्र, सुरजच्या नवीन घराचे फर्निचर समोर आल्यानंतर हे लक्षात आले की, सोफासेट दुसऱ्याच कोणीतरी दिला आहे. यावरून डीपी दादा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले. आणि सोशल मीडियावर अनेकांनी आरोप केला की, “डीपी दादाने बिग बॉसमध्ये फक्त मतांसाठी आश्वासन दिलं” आणि त्याचा शब्द निभावला नाही.(DP Dada & Suraj Chavan Fight)

आता या ट्रोलिंगला कंटाळून धनंजय पोवार यांनी ८ मिनिटांचा व्हिडिओ शेअर करून संताप व्यक्त केला आहे आणि संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे सांगितलं. डीपी दादाने स्पष्ट केलं की सुरजला सोफा बाहेरून मिळालं होतं, आणि सुरजने त्याला त्याच्या फोन कॉल्सला प्रतिसाद दिला नाही. “मी त्याला ३-४ वेळा कॉल केला होता, त्याला अॅड्रेस पाठवायला सांगितलं होतं, पण त्याने काही उत्तर दिलं नाही. तो लग्नाच्या आदल्या रात्रीच मला पत्ता पाठवला, सुरजला सोफा मिळाला, त्याने तो घेतला, पण त्याने मला सांगितलं नाही, हेच डीपी दादाच्या दुःखाचं कारण होतं. ते पुढे असे ही म्हणाले की, “कदाचित आज त्याला कोणीतरी जास्त देत असेल, म्हणून तो मला विसरला का?”असा भावनिक प्रश्न डीपी दादाने उपस्थित केला.

याबरोबर डीपी दादाने ट्रोलर्सला चांगलेच झापलं आणि आपल्या खंत व्यक्त केली.ते म्हणाले की “आम्ही जे काही आहोत, ते स्वतःच्या हिंमतीवर आहोत. मला ट्रोल करत बसण्यापेक्षा, तुम्ही सुरजला प्रश्न विचारला असता,” असं स्पष्टपणे सांगत डीपी दादाने ट्रोलर्सना आव्हान दिलं. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की तो अजूनही सुरजला सोफासेट देण्यासाठी तयार आहे, पण सुरजने त्याला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे होते.(DP Dada & Suraj Chavan Fight)
===============================
हे देखील वाचा: अभिनेत्री Ashwini Mahangde ने दिला ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा; पोस्ट करत दिल कारण…
===============================
या वादामुळे बिग बॉस मराठी ५ च्या दोन मित्रांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सुरज आणि डीपी दादाच्या या संबंधांमध्ये आता कटुता येण्याची शक्यता आहे. तसेच एवढ होईनही डीपी दादाने सोफासेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आहा पुढी नेमक काय होत याकडे त्यांच्या चाहत्यांच लक्ष लागून राहील आहे.