Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Bai Tujha Ashirwad: स्टार प्रवाहवर नव्या मालिकेचा AI टीजर रिलीज;

Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

सांज ये गोकुळी सावळी सावळी..

आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान

KJVMM BOX Collection: हेमंत ढोमेंच्या चित्रपटानं राखला बॉक्स ऑफिसचा गड

“तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sanju Rathod : मराठी पोट्ट्याने पॉप म्युझिकचं अख्खं मार्केट जाम केलंय!

 Sanju Rathod : मराठी पोट्ट्याने पॉप म्युझिकचं अख्खं मार्केट जाम केलंय!
कलाकृती विशेष

Sanju Rathod : मराठी पोट्ट्याने पॉप म्युझिकचं अख्खं मार्केट जाम केलंय!

by रसिका शिंदे-पॉल 10/12/2025

‘गुलाबी साडी’, ‘शेकी शेकी’ आणि ‘सुंदरी सुंदरी’…या युनिक पॉप मराठी गाण्यांवर थिरकतानाचे लोकांचे बरेच रील्स तुम्ही पाहिलेच असतील. शिवाय, केवळ महाराष्ट्रातच नाही तर आपल्या या मराठी पॉप गाण्यांनी न्यूयॉर्कच्या Times Square बिलबोर्ड गाठला आहे… युट्युबवर मिलियन व्ह्युजमध्ये खेळणाऱ्या या मराठी गाण्यांनी तुफान राडा केला आहे. ही गाणी तयार केली आहेत, जळगावच्या एका पोट्ट्याने… ज्याला खरं तर इंजिनिअर बनायचं होतं. पण म्युझिकचं भयंकर वेड असल्यामुळे त्याने हेच करिअक निवडलं आणि त्यात यश मिळवून दाखवलं… खरं तर म्युझिक इंडस्ट्रीत बरेच प्रयोग केले जातात आणि यातच संजू राठोडने चक्क मराठी पॉप संगीत बनवायला सुरुवात केली आणि फक्त महाराष्ट्र, भारतातीच नाही तर फॉरेनर्स लोकांनाही आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं… जाणून घेऊयात जळगावच्या संजू राठोडचा प्रवास… (Sanju Rathod)

संजू हा जळगावच्या धनवडचा… गेल्या काही वर्षात rap म्युझिकचं वारं सगळ्यांवरच चढलंय. त्यामुळे हा पोट्टासुद्धा छोटे-मोठे rap लिहायचा. इंजिनिअरिंगला होता पण त्यात मन रमलं नाही. टीव्हीवर Rappers आणि पॉप Artists ची गाणी पाहून त्यालाही वाटलं असं काहीतरी करायचं पण आपल्या मातृभाषेत… म्युझिकमध्ये करिअर करायचं फायनल केलं… आपला एक सेकंड-हॅण्ड लॅपटॉप घेऊन मुंबईला आला आणि आपल्या स्वप्नांच्या मागे धावू लागला. आणि इथेच सुरु झाला संजूचा ‘M-Pop’ म्हणजेच मराठी पॉपचा प्रवास… गाणी बनवायची आणि ती युट्युबवर टाकायची… असा आजपासून ७-८ वर्षांपूर्वी ट्रेंड होता. हाच ट्रेंड संजूने आजमावून पाहिला. त्याने २०१८ ला आपलं पहिलं गाणं ‘ती प्रेमात वेडी’ रिलीज केलं. आणि मग काय? पहिलंच गाणं तुफान गाजलं… त्यानंतर त्याने ‘बाप्पा वाला गाना’, ‘नारी तुझे रुप’, ‘पोरी तुझा छंद लागला’, ‘डिंपल’, ‘इश्काचा नाद’, ‘करमत नाही’ अशी काही मराठी पॉपची गाणी तयार केली. पण संजू राठोड सुरुवातीला फक्त महाराष्ट्रापुरता सीमित होता. तीन वर्षांपूर्वी त्याने एक गाणं काढलं होतं, ‘नववारी पाहिजे’… जे प्रचंड गाजलं आणि मेगा हिट ठरलं. युट्युबवर त्याला २०० मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले. महाराष्ट्रातल्या अनेक लग्नांमध्ये डीजेवर हेच गाणं वाजू लागलं.

संजूच्या याच गाण्याला ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या AWARD SHOW मध्ये Favourite Song (Non-film) हा अवार्ड मिळाला आणि संजूला इंडस्ट्रीत पहिली ठोस ओळख मिळाली. संजू राठोड नावाचा आर्टिस्ट जबरदस्त मराठी पॉप गाणी बनवतो, अशी चर्चा आता सगळीकडे व्हायला लागली.  त्यानंतर मात्र संजूने धमाका केला. बर नुसता धमाका नाही तर ग्लोबल धमाका… त्याचं एक गाणं आलं ‘गुलाबी साडी’. भारतामधली लोकं सोडा…. फॉरेनरसुद्धा या गाण्यावर थिरकायला लागले. मराठीपासून बॉलीवूडचेही सेलिब्रिटी यावर रील्स बनवायला लागले. नुसतं इकडे तिकडे गुलाबी साडी हेच गाणं सुरु…  ‘गुलाबी साडी’ने ५०० मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला. संजू या एका गाण्यामुळे इतका फेमस झाला की चक्क न्यूयॉर्कच्या Times Square बिलबोर्डवर झळकला. या आयकॉनिक बिलबोर्डवर झळकणारं हे पहिलं मराठी गाणं होतं. याशिवाय याच गाण्याने आणखी एक रेकॉर्ड बनवला, तो म्हणजे १००M+ Spotify streams ओलांडणारा पहिला मराठी इंडिपेंन्डन्ट ट्रॅक!

जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता संजू राठोड काही ऐकतच नव्हता. सगळीकडे संजूच्या ‘गुलाबी साडी’ने हवा करून ठेवली होती. रील्स वर रील्स बनतच होत्या. यानंतर संजू स्वतः ‘Superstar Singer 3’ सारख्या शोवर परफॉर्म करून ऑल-इंडिया टेलिव्हिजनवर पोहोचला आणि गावाकडचा मुलगा आता पॅन-इंडिया फेस झाला. त्याने चक्क सनबर्नसारख्या फेमस EDM फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केलं. विचार करा, जिथे पोरं फक्त इंग्लिश गाण्यांवर थिरकायला येतात, तिथे हा पोट्टा मराठी गाण्यावर सगळ्यांना नाचायला लावत होता. यानंतर त्याने आणखी एक बझुकाच काढला. तो म्हणजे ‘शेकी शेकी’ हे गाणं ! २२ एप्रिल २०२५ ला त्याने ‘शेकी शेकी’ रिलीज केलं. यामध्ये Afrobeat, Banjara folk, hip-hop आणि Marathi pop यांचं फ्युजन होतं.

================================

हे देखील वाचा : Samantha Ruth Prabhu- Raj Nidimoru यांचं ‘भूत शुद्धी विवाह’ पद्धतीने लग्न; काय असते ही परंपरा?

================================

आता या वर्षाच्या शेवटी संजू राठोड हा २०२५ मधील सर्वाधिक ऐकला जाणारा मराठी कलाकार बनलाय. कारण YouTube वर त्याला लोकांनी २८ कोटींहून जास्त तास ऐकलंय. भाषा मराठी पण वाईब सगळं जग करतंय हे खास आहे. याशिवाय २०२५ मध्ये संजू राठोड हा २.७ अब्ज युट्यूब व्ह्यूज मिळवणारा एकमेव मराठी कलाकार ठरला आहे… मराठी पॉपची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संजूने हे दाखवून दिलंय की टॅलेंट असलं की, आपण झिरोपासून हिरो बनू शकतो.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Entertainment Entertainment News gulabi saree song sanju rathod sanju rathod music sanju rathod songs shaky shaky song
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.