SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Akshaye Khanna ला पाहून बलूच नेता म्हणाला तो आमच्यासारखाच दिसतो….
सोशल मिडिया सुरु केलं की ‘धुरंधर’मधल्या अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) युनिक डान्सने आपलं लक्ष वेधलं जात आहे… आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar चित्रपटात बलुचिस्तानातील अत्याचारांचे वास्तव अधोरेखित केले आहे… आणि याबद्दल बलुच अधिकार चळवळीतील प्रमुख आवाजांपैकी एक असलेल्या मीर यार बलोच यांनी अक्षय़ खन्नाचं कौतुक करत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. इतकंच नाही तर बलुचिस्तानमधील (Balochistan) गंभीर आणि संवेदनशील विषयाला हात घातल्याची दखलही त्यांनी घेतली आहे… नेमकं मीर यार बलोच काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात… (Dhurandhar movie)

मीर यार बलोच (Mir Yaar Baloch) यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सकारात्मक बाजूला अधोरेखित केले आहे. या चित्रपटात पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये चालवलेला अन्याय आणि दडपशाही याकडे लक्ष वेधलं आहे. बलोच लोकांवर होणारे अत्याचार आणि त्यांना सोसावा लागणारा संघर्ष हिंदीतील अशा एका मोठ्या चित्रपटात दाखवला जाणे, हे या विषयाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. बलोच चळवळीच्या समर्थनासाठी हा चित्रपट एक प्रभावी माध्यम ठरू शकतो, असं मत बलोच यांनी व्यक्त केलं आहे. (Bollywood)
तसेच, या चित्रपटातील अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याच्या भूमिकेचे आणि लूकचे विशेष कौतुक करत मीर यार बलोच म्हणाले की, अक्षय खन्नाने पारंपरिक बलोची सांस्कृतिक वेशभूषा (Traditional Balochi Cultural Attire) परिधान केली असून, तो हुबेहूब बलोची व्यक्तीसारखा दिसत आहे. अक्षयने साकारलेली ही व्यक्तिरेखा केवळ अभिनयाच्या दृष्टीने नव्हे, तर सांस्कृतिक प्रतिनिधित्व म्हणूनही प्रभावी ठरली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याने बलोची संस्कृतीला दिलेले हे महत्त्व, बलोच समुदायासाठी अभिमानास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar ने धुरळा केलाय; पण तरीही…
================================
दरम्यान, आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी देशभरात रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची टक्कर अभिनेता यश याच्या ‘टॉक्सिक’ (Toxic) चित्रपटाशी होणार आहे… त्यामुळे दोन्ही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी कुणाचा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार आणि कोणता चित्रपट कुणावर भारी पडणार याचं उत्तर १९ मार्चला नक्कीच मिळेल.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi