
Human Cocaine चित्रपटाचा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित
मराठी अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘ह्युमन कोकेन’ चित्रपटाच्या निमित्ताने तो पाऊल टाकत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण दिसणार आहे.
‘ह्युमन कोकेन’च्या ट्रेलरमध्ये पुष्कर जोग अगदी नव्याच रूपात दिसतोय. तो पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात झळकणार असून त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे. एका भयावह जाळ्यात अडकलेला कैद्याची तो भूमिका साकारत आहे. जिथे सुटकेची किंचितही शक्यता उरलेली नाही. इशिता राज प्रथमच एका काळोख्या आणि धगधगत्या व्यक्तिरेखेत दिसते. तर ज्येष्ठ अभिनेते जाकीर हुसेन अंगावर काटा आणणाऱ्या भूमिकेत दिसत आहेत. पडद्यावर त्यांची उपस्थितीच भीती निर्माण करण्यास पुरेशी ठरते.

‘ह्युमन कोकेन’ची कथा अत्यंत महागड्या, नव्या आणि मानवी मन सुन्न करणाऱ्या अमानुष प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कोकेनच्या प्रकाराभोवती फिरते. या निःसंवेदनशील सत्याच्या गर्तेत पुष्कर जोग आणि इशिता राज सापडतात आणि त्यांचा या भीषण अंधाऱ्या जगात कसा ऱ्हास होतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. निखळ वास्तवावर आधारित ही कथा अंडरवर्ल्डच्या अंधाऱ्या आणि दडवलेल्या जगाचा पर्दाफाश करणारी आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना पुष्कर जोग म्हणतात, ” ‘ह्युमन कोकेन’ने मला कलाकार आणि माणूस म्हणून आकार दिला आहे. माझ्या व्यक्तिरेखेची असहाय्यता, भीती आणि अंतर्गत तडफड कॅमेरा बंद झाल्यानंतरही मनात रेंगाळत राहिली. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वांत महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे.”
================================
हे देखील वाचा : Human Cocaine : पुष्कर जोगचा नवा लूक; वास्तव कल्पनेपेक्षा अधिक भयानक असलेला थरारकपट
================================
दरम्यान, इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही प्रभावी ब्रिटीश कलाकारांच्या दमदार भूमिकांनी सजलेला हा चित्रपटयुनायटेड किंगडममध्ये बऱ्याच प्रमाणात चित्रीत झाला आहे. हा चित्रपट देशभरात १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi