Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Bigg Boss Marathi Season 6 : आला रे आला…!! बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो रिलीज
बहुचर्चित मराठी बिग बॉसचा सहावा सीझन (Marathi Big Boss Season 6) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… सलमान खान होस्ट करत असलेला हिंदीचा १९वा सीझन नुकताच संपला असून आता मराठी बिग बॉसचा सहावा सीझन कलर्स मराठी वाहिनीवर येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानने (Salman Khan) मराठी बिग बॉसच्या होस्टचं इंड्रोडक्शन केलं होतं… आणि यंदाही रितेश देशमुखचं सहावा सिझन होस्ट करणार असून एख नवा प्रोमो समोर आला आहे…

‘कलर्स मराठी’ने सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय. ‘आला रे आला…’ अशी या प्रोमोची सुरुवात होताना दिसते.. दारात सुंदर रांगोळी, दरवाज्याला झेंडूच्या फुलांचं तोरण, ढोल आणि जांभळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये पाठमोरा असलेला अभिनेता दिसतो आहे. त्यानंतर बिग बॉस मराठी लवकरच… असं लिहिलेलं दिसतंय.. हा प्रोमो शेअर करत, ‘आला रे आला…!! आपला लाडका रितेश भाऊ आला… घेऊन एकदम लय भारी धमाका..’ असं कॅप्शन लिहिलं आहे. (Ritesh Deshmukh)
================================
हे देखील वाचा : Big Boss Marathi Season 6 लवकरच!;कोण असणार होस्ट आणि कंटेस्टंट?
================================
दरम्यान, सहाव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार? काय थीम असणार? किती राडे होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच, बिग बॉस मराठी ६च्या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने, “कोण कोण आहेत स्पर्धक? काही संकेत..?” असं लिहिलं आहे… तर, दुसऱ्या युजरने लिहिले की, “राडा होणार आता”. आणखी एकाने लिहिले की, “भाऊ, थँक्यू सो मच. खूप लवकर आलात तुम्ही. तुमची वाट बघत होतो आम्ही”.
दरम्यान, मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनची विनर होती मेघा धाडे, दुसऱ्या सीझनचा विनर होता शिव ठाकरे, तिसऱ्या सीझना विनर होता विशाल निकम, चौथ्या सीझनचा विनर होता अक्षय केळकर आणि पाचव्या सीझनचा विनर होता सुरज चव्हाण… सगळ्या सीझनचे विनर पाहिले तर एक गोष्ट नक्की लक्षात येते की या सगळ्यात एकच Female Contestant विनर होती.. त्यामुळे आता येणाऱ्या सहाव्या सीझनमध्ये मुलगी विनर व्हावी अशी इच्छा नक्कीच आहे… तसेच, सध्या हिंदी बिग बॉसचा १९वा सीझन सुरु असून तो संपल्यावरच मराठी बिग बॉसचा सहावा सीझन सुरु होई असा अंदाज बांधला जात आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi