Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

‘लाफ्टर क्वीन’ Bharti Singh दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस मुलाला दिला जन्म
हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांच्या घरी १९ डिसेंबर २०२५ रोजी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे… प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारती आणि हर्षच्या आयुष्यात दुसऱ्या गोंडस मुलाच्या रुपात आनंदाची भर पडली आहे… दरम्यान, भारती नवव्या महिन्यापर्यंत ‘लाफ्टर शेफ’ कार्यक्रमाचं शुट करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीला कार्यक्रमाचं शुटींग सुरु असतानाच प्रसुतीवेदना सुरु झाल्या आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं… आणि त्यानंतर तिने मुलाला जन्म दिला… दरम्यान, भारती आणि हर्ष यांना २०२२ मध्ये पहिला मुलगा झाला होता ज्याचं खरं नाव लक्ष्य असून इंडस्ट्रीत मात्र त्याची ओळख गोला अशी आहे… (Television News)

काही दिवसांपूर्वीच फिल्मी जगतातील जवळच्या लोकांसोबत भारतीचं डोहाळदेवण झालं होतं.. यावेळी तिच्या मित्र मैत्रिणींनी आवर्जून हजर राहात तिचे लाड पुरवले होते… शिवाय, बऱ्याच दिवसांपासून भारती आणि हर्ष यांचे व्हिडिओ व्हायरल होत होते ज्यात त्यांना दुसऱ्यांदा मुलगा हवा की मुलगी असा प्रश्न विचारलता जात होता… आणि त्यावेळी भारतीने मुलगी हवी असं म्हटलं होतं… ‘मुलानंतर एक मुलगी तर असावीच. घरात शिस्त राहते. गोला तर खूप उत्साहित आहे. गोला नंतर आता गोली हवी’ अशी तिने प्रतिक्रिया दिली होती. (Bharti Singh Pregnancy News)
================================
================================
भारती सिंग हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली… पुढे या पंजाबच्या मुलीने मुंबईत येत संपूर्ण बॉलिवूड आपल्या ताब्यात घेतलं… विनोदी शैलीने तिने सगळ्यांचीच मनं जिंकत ‘कॉमेडी सर्कस’, ‘खतरो के खिलाडी’ अशा बऱ्याच शो मध्ये सामिल झाली… हिंदीतील अॅवॉर्ड शो होस्ट करण्यापासून ते स्वत:चं पर्सनल युट्यूब चॅनल चालवण्यापर्यंत भारती आणि हर्ष प्रत्येक क्षणाला प्रेक्षकांना केवळ आनंद देत असतात… (Entertainment)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi