प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

“’सैराट’मधला ‘तो’ इंटीमेट सीन करताना मी खुप…”; Rinku Rajguru हिने सांगितला खास किस्सा
रातोरात दोन मान्य मुलं स्टार झाली आणि त्यांचं नशीब कायमचच पलटलं… आणि ते २ कलाकार म्हणजे लोकांना ‘सैराट’ (Sairaat) करणारे रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Aakash Thosar)… नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटातून फिल्मी दुनियेत येणाऱ्या रिंकु आणि आकाशने फार कमी कालावधीत लोकांचं मनं जिंकली… ‘सैराट’मधल्या दोघांच्या अभिनयाची चर्चा तर झालीच पण या युनिक लव्ह स्टोरची भूरळ बॉलिवूडलाही पडली… मराठी चित्रपटसृष्टीत १०० कोटी कमावणाऱ्या या पहिल्या चित्रपटात आर्ची आणि परशाचा एक किसींग सीन होता… ज्यावेळी मुव्ही शुट झाला दोघेही फार लहान होते, रिंकु तर शाळेतच होती, त्यामुळे तिच्यासाठी हा पहिल्याच चित्रपटातला हा बोल्ड सीनच होता… अलीकडेच एका मुलाखतीत रिंकूने तो सीन नेमका कसा शुट झाला त्याचा किस्सा सांगितला आहे… चला तर मग जाणून घेऊयात…(Marathi Movies)

‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने सैराटच्या सेटवरील बऱ्याच गंमती सांगितल्या… यावेळी तिला कारमधील इंटिमेट सीन करताना तुला भीती नाही वाटली का?”, असा तिला प्रश्न विचारण्यात आला. यावर रिंकू म्हणाली,”हा सीन ज्यावेळेस मी ऐकला तेव्हा मी घाबरले होते. पण तेव्हा नागराज दादांनी (Nagraj Manjule) माझी समजूत घातली. अगं, दिसतं तसं करताना दिसत नाही, असं ते म्हणाले. कॅमेऱ्याची मूव्हमेंट असते. हा सीन करताना आम्ही फालतूच्या गप्पा मारत होतो. कोणत्याही कारणावरून आम्ही दोघेही हसत होतो. त्यामुळे मला हा सीन करताना कोणतीही भीती वाटली नाही. महत्वाचं म्हणजे ‘सैराट’च्या वेळेस आम्ही सर्वेजण एकत्र ४ महिने राहिलो होतो. त्यामुळे आमच्यात मैत्री झाली होती. आमच्यात कम्फर्ट झोन तयार झाला होता“…
================================
================================
लोकांना ‘सैराट’ कणाऱ्या आर्ची आणि परशा यांनी परत ‘झुंड’ (Zhund) चित्रपटात एकत्र काम केलं.. पण त्यानंतर पुन्हा ते एकत्र दिसले नाहीत… आज चित्रपट रिलीज होऊन ९ वर्ष झाली असली तरी लोकांमध्ये क्रेझ काही कमी झाली नाहीये… मराठीत ११० कोटी कमावणारा हा पहिला चित्रपट असून आजपर्यंत बॉक्स ऑफिसवरचा हा रेकॉर्ड कुठलाही चित्रपट मोडू शकला नाही… (Sairaat Movie Box Office Collection 2016) शिवाय, रिंकूच्या प्रोजेक्ट्सबाबत सांगायचं झालं तर नुकताच तिचा ‘आशा’ (Aasha) हा चित्रपट रिलीज झाला… आणि २०२६ मध्ये ती अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ (Punha Ekda Saade Maade 3) मध्ये दिसणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi