जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

‘तू अभिनेता म्हणून शून्य आहे…’; Abhinay Berdeला ‘ही’ दिग्गज अभिनेत्री असं का म्हणाली होती?
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदीर लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत…. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने इंडस्ट्रीत आपला जम बसवलाच… नुकताच त्याचा उत्तर चित्रपट रिलीज झाला ज्यात अभिनयने रेणूका शहाणेंसोबत स्क्रिन शेअर केली होती… दरम्यान, याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनयने त्याला एका अभिनेत्रीने चक्क “तु अभिनेता म्हणून शुन्य आहेस”, असं म्हटल्याचं सांगितलं होतं.. कोण आहेत त्या? आणि काय कघडलं होतं? जाणून घेऊयात… (Abhinay Laxmikant Berde)

तर, अभिनय बेर्डे याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता… तो म्हणाला होता की, माझी आई प्रिया बेर्डे (Priya Berde) हिच माझी सर्वात मोठी टीकाकार आहे… तिला जर का एखादी गोष्ट नाही आवडली, तर ती तोंडावर ‘नाही आवडलं’ असं म्हणते. ‘घाणेरडं काम केलं आहेस’, असंही ती थेट म्हणते. मला ती एकदा ‘तू अभिनेता म्हणून शून्य आहेस’, असंही म्हणाली होती. तेव्हा मला वाईट वाटलेलं. पण त्यामुळे मला स्वत:वर काम करायला खूप मदत झाली. ती कायम मला एक रिअॅलिटी चेक देत असते…” (Marathi Movies 2025)
पुढे अभिनय म्हणाला की, ” हा मी किस्सा सांगतोय तेव्हा मी फारसं काम करत नव्हतो, मी घरी होतो. बाहेरच्या लोकांशी फारसा संवाद होत नव्हता. त्यामुळे आजूबाजूला काय सुरू आहे, याचं भान नव्हतं. ही लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. तेव्हा तिनं मला ‘स्वत:वर काम कर’, असं सांगितलं होतं. ‘तू अभिनेता म्हणून शून्य आहेस. तुला स्वत:वर अभिनेता म्हणून काम करण्याची गरज आहे. तुझी तुलना थेट तुझ्या वडिलांशी होणार आहे. तू त्यांच्यासारखं काम करशील की, नाही किंवा ते यश साध्य करशील की नाही हे महत्त्वाचं नाही; पण तुला मिळणाऱ्या संधीचं सोनं करणं गरजेचंय. त्यासाठी तू चांगला अभिनेता असणं गरजेचं आहे…, असं ती म्हणालेली. (Bollywood)
================================
================================
दरम्यान, अभिनय बेर्डे याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ‘ती सध्या काय करते’ चित्रपटातून त्याने मराठी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ‘रंपाट’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सिंगल’, ‘बॉईज 4’, ‘दशावतार’ (Dashavatar), ‘वडापाव’ यांसारखे अनेक चित्रपट केले. नुकताच त्याचा ‘उत्तर’ (Uttar Movie 2025) चित्रपट रिलीज झाला ज्याचं दिग्दर्शन क्षितीज पटवर्धन याने केलं होतं… यात रेणूका शहाणे, ह्रता दुर्गुळे, निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका होत्या…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi