Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

KJVMM Box Office Collection: मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं!
मराठी शाळांचं अस्तित्व वाचवण्यासाठी आणि आजच्या पिढीला मराठी भाषा आणि शाळांचं महत्व पटवून देण्यासाठी हेमंत ढोमे यांचा ‘क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे… २०२६ या नव्या वर्षाची पहिलीच भेट या चित्रपटाच्यारुपाने हेमंत ढोमेने दिली असून प्रेक्षकांनीही चित्रपटाचा उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे… जाणून घेऊयात बॉक्स ऑफिसवर या चित्रपचाने किती कमाई केली आहे…
बॉक्स ऑफिस आणि थिएटर्समध्ये रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाचा धुमाकूळ सुरुच आहे.. पण असं असलं तरी मराठी चित्रपटही या चित्रपटाला टक्कर देत आहेत… सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार या चित्रपटानं पहिल्या दिवशी महाराष्ट्रात १८ लाख आणि जगभरात २० लाखांची कमाई केली आहे… तसेच, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सारख्या शहरांमधील मल्टिप्लेक्समध्ये अनेक शो ‘हाऊसफुल’ पाहायला मिळाले.

तसेच, सध्या हिंदीतही कोणता मोठा चित्रपट अद्याप रिलीज होणार नसून ‘क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाला बक्कळ कमाई करण्यासाठी वाव आहे… पहिल्याच दिवशी मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादानंतर पहिल्या वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे… येत्या काळात २४ जानेवारीपर्यंत हिंदीत जरी कोणता चित्रपट येणार नसला तरी ‘क्रांतीज्योति विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाला इक्कीस आणि ‘धुरंधर’ला टक्कर द्यायची आहे… (Marathi Movie 2026 Box office collection)
================================
हे देखील वाचा : “आम्ही आता म्हातारे झालोय…”; R Madhavn ३ इडियट्सच्या सीक्वेलबद्दल काय म्हणाला?
================================
‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर युट्यूबर आणि बॉलिवूड अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिनं या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi