
Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam चित्रपटाची ‘धुरंधर’ला जोरदार टक्कर!
२०२६ या नव्या वर्षाची सुरुवात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाने जोरदार केली. १ जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं आहे. ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ अशा गाजलेल्या यशस्वी चित्रपटांनंतर मराठी शाळांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे धुरंधरचं वारं जोरदार सुरु असताना दुसरीकडे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन… (Hemant Dhome)
हेमंत ढोमेनं ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातून मराठी शाळा आणि मराठी भाषेबद्दलचं मत व्यक्त केलं आहे. या विषयानं अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सर्वत्र सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमानं आठवडाभरात पाच कोटींचा गल्ला पार केला आहे. कायमच समाजातील विविध विषयांवर हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करत लोकांची मनं जिकण्याचा हेमत ढोमे यांचा हा आणखी एक प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला आहे.

सॅकनिल्कच्या माहितुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ७ लाख, दुसऱ्या दिवशी ४५ लाख, तिसऱ्या दिवशी १.०५ कोटी, चौथ्या दिवशी १.५ कोटी, पाचव्या दिवशी ५ लाख, सहाव्या दिवशी ५ लाख, सातव्या दिवशी ५ लाख, आठव्या दिवशी ५५ लाख, नवव्या दिवशी ६० लाख कमवत आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण ६.३५ कोटींची कमाई केली आहे. त्यात शनिवार आणि रविवारी सिनेमाच्या कमाईत आणखी भरही पडू शकते. (Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam Box Office Collection)
================================
================================
दरम्यान, , ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटात क्षिती जोग, सचिन खेडेकर, निर्मिती सावंत, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, प्राजक्ता हिचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Marathi Movie 2026)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi