
KJVMM BOX Collection: हेमंत ढोमेंच्या चित्रपटानं राखला बॉक्स ऑफिसचा गड , १५ दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई
२०२६ या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटांनी दमदार केली आहे… हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हिंदीत धुरंधरचा अजूनही धमाका सुरु असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसचा गड राखण्यात या मराठी चित्रपटाला यश मिळालं आहे. १५ दिवसांत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली असून महाराष्ट्रभरातील बऱ्याच मराठी शाळांना याचा फायदा आणि मराठी शाळा व भाषेचं अधिक महत्व समजण्यास उपयोग नक्कीच झाला आहे. जाणून घेऊयात’क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने किती कमाई केली…

सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ने पहिल्या दिवशी ७ लाख, दुसऱ्या दिवशी ४५ लाख, तिसऱ्या दिवशी १.०५ कोटी, चौथ्या दिवशी १.५ कोटी, पाचव्या दिवशी ५ लाख, सहाव्या दिवशी ५ लाख, सातव्या दिवशी ५ लाख, आठव्या दिवशी ५५ लाख कमवत पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५.७५ कोटी कमावले होते. पुढे नवव्या दिवशी ६ लाख, दहाव्या दिवशी १.६५ कोटी, अकराव्या दिवशी २.१ कोटी, बाराव्या दिवशी ६५ लाख, तेराव्या दिवशी ६६ लाख, चौदाव्या दिवशी ८ लाख, पंधराव्या दिवशी १.३५ कोटी, सोळाव्या आणि सतराव्या दिवशी अंदाजे १० लाख कमवत आत्तापर्यंत एकूण १४.०१ कोटी कमावले आहेत. आता या चित्रपटाने १५ कोटींचा आकडा पार करण्याचा प्रवास सुरु केला आहे. (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Box Office Collection)
================================
हे देखील वाचा : अमेरिकेतही Dhurandhar चा दबदबा, रणवीर सिंगच्या चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी
================================
हेमंत ढोमे कायमच प्रेक्षकांना भावेल अशाच विषयांवर आधारित चित्रपट घेऊन येत असतात… आता मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर असताना हा चित्रपच घेऊन येत त्यांनी लोकांची मनं जिंकली. मराठी माध्यमाच्या शाळेला वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिलेला लढा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग , कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि चिन्मयी सुमित अशा लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi