Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट

रणजीत गजमेर यांचे मादल वाद्य आणि त्यावरची R.D.Burmanची बेहतरीन गाणी!
माणिक चटर्जी दिग्दर्शित रेखा विनोद मेहरा यांचा ‘घर’ हा चित्रपट ९ फेब्रुवारी १९७८ रोजी प्रदर्शित झाला होता. गुलजार यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली होती. तर संगीत राहुल देव बर्मन यांचं होतं. हा चित्रपट आज देखील या सिनेमातील गाण्यांसाठी आवर्जून आठवला जातो. आर डी बर्मन यांचा कुठलाही म्युझिकल शो या चित्रपटातील गाण्यांशिवाय अधुरा असतो. या सिनेमात एक गाणं होतं ‘तेरे बिना जिया जाये ना ..’ लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या या गाण्यात प्रॉमिनंटली आपल्या लक्षात राहतं एक वाद्य; जे वाद्य वाजवलं होतं रणजीत गजमेर यांनी आणि त्या वाद्याचं नाव होतं मादल. तुम्ही हे गाणं लक्षपूर्वक ऐका मादल या गाण्यांमध्ये पूर्णपणे स्वराला आणि स्वराला साथ देत देताना दिसते.
मादल हे एक नेपाळी फोक इन्स्ट्रुमेंट आहे. हे वाद्य Percussion instrument म्हणून ओळखले जाते. आपल्याकडील ढोलकी सोबत मादल चे भरपूर साम्य आहे. वाद्यांच्या गदारोळात त्याची वेगळी आयडेंटिटी आपल्याला लक्षात येते. या वाद्याचे प्रमुख वादक रणजीत गजमेर हे नेपाळ आणि दार्जिलिंग या भागातील लोक संगीतातील चांगले वादक होते. त्यांना मनोहरी सिंग यांनी नेपाळहून बोलावून घेतले आणि आरडी बर्मन कॅम्पस मध्ये सामील केल . त्यांचं पहिलं गाजलेलं गाणं होतं १९७१ साली प्रदर्शित झालेला ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ‘कांची रे कांची रे’ हे गाणे इतकं लोकप्रिय झालं की या गाण्याचे संगीतकार आरडी बर्मन यांनी रणजीत गजमेर यांचं नाव बदलून कांचा ठेवलं! आणि सर्वजण त्यांना याच नावाने बोलावू लागले.

पंचम गटात प्रवेशाचा किस्सा भन्नाट आहे. रणजीत गजमेर लहानपणापासूनच दार्जिलिंग, कलकत्ता, नेपाळ, काठमांडू इथे संगीतातील विविध वाद्य वाजवत होते. तबला, गिटार आणि मादल ही त्यांची आवडीची वाद्य होते. राहुल देव बर्मन यांचे संगीत संयोजक मनोहारी सिंग एकदा कलकत्त्याला एचएमव्ही स्टुडिओमध्ये आले होते. तिथे त्यांची भेट रणजीत गजमेर यांच्या सोबत झाली. त्यांना रणजीत यांनी वाजवलेले मादल खूप आवडले. त्यांनी रणजित यांना मुंबईत मादल हे वाद्य घेवून येण्याचे निमंत्रण दिले.
काही दिवसांनी रणजीत गजमेर मुंबईत पोहोचले आणि त्यांनी मनोहर सिंग यांना कॉन्टॅक्ट केला. मनोहारी यांनी त्यांना आर डी बर्मन यांना भेटायला बोलावले. तेव्हा देव आनंद च्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाच्या म्युझिक ची सेटिंग चालू होती. हा संपूर्ण चित्रपट नेपाळमध्ये चित्रित होणार होता. त्यामुळे देव आनंद आणि पंचम यांना तिथल्या फोक म्युझिक वर आधारित गाणे बनवायची होती. मनोहारी सिंग यांनी रणजीत गजमेर यांना तिथे बोलावले. देव आनंद यांनी रणजीत गजमेर यांच्या कडील मादल हे वाद्य पाहिले. त्यांनी विचारले ‘ये क्या है? कैसे बजता है?” त्यांनी मग मादल वाजवायला सांगितले. हे वाद्य आपल्याकडील ढोलकी सारखे असते पण आकाराने छोटे असते. रणजीत गजमेर यांनी नेपाळचे एक लोक संगीत मादल द्वारे वाजवून दाखवले. सोबत एक लोकगीत देखील गाऊन दाखवले.

देव आनंद यांना ते खूपच आवडले. ते जोरात ओरडले,” धिस थिंग आय वॉन्ट!!” आर डी बर्मन देखील खूष झाले. लगेच त्यांनी आनंद बक्षी यांना बोलावून त्या धून वर शब्द लिहायला सांगितले. रणजीत गजमेर यांनी गायलेल्या लोकगीतातील ‘कांचा’ हा शब्द घेऊन गाणे तयार झाले. लगेच दोन दिवसांनी मुंबईच्या फेमस स्टुडीओ मधील रेकॉर्डिंग रूम मध्ये ध्वनिमुद्रित झाले. या रेकॉर्डिंगला लता मंगेशकर आणि किशोर कुमार उपस्थित होते. मनोहारी सिंग , बासुदा यांनी रणजीत गजमेर ला सर्वात समोर ठेवले.आणि त्याच्या मादलला प्रॉमिनंट पणे संगीतात वापरले. या गाण्यांमध्ये प्रमुख वाद्य मादल हेच होते. गाणे होते ‘कांची रे कांची रे…’ ते रेकॉर्डिंग संपले आर डी बर्मन प्रचंड खूष झाले. त्यांनी शाबासकी देत रणजीत गजमेर याना म्हणाले,” आजपासून तुझे नाव रणजीत गजमेर नाही. तुझे नाव आता ‘कांचा’ . ये तुम्हारा गाना है और ये गाना अगले पचास साल तक गुंजता रहेगा!” अशा पद्धतीने रणजीत गजमेर यांचे नाव कांचा झाले.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
‘घर’ या सिनेमात तेरे बिना जिया जाये ना या गाण्यात मादल वाजवण्याचे आयडिया त्यांचीच. या गाण्यात तुम्ही पहा सुरुवातीपासून मादल हे वाद्य स्वराला आणि सुराला अतिशय सुंदर साथ देताना दिसते. एका गाण्यात तर आर डी बर्मन यांनी केवळ दोन वाद्यांचा चा वापर करून एका अप्रतिम गाण्याचे निर्मिती केली होती. त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला ऐनवेळी म्युझिशियनचा मुंबईमध्ये संप सुरू झाला होता. गाणे रेकॉर्ड करणे गरजेचे होते . याचे कारण शूटिंग शेड्यूल लागले होते . त्यामुळे रणजीत गजमेर यांचे मादल आणि होमी मुल्ला यांनी केवळ सॅंड पेपर घासून साऊंड क्रिएट केला आणि त्यातून हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले हे गाणं सुरू तयार झालं राजेश खन्ना झीनत अमान यांच्यावर चित्रित हे गाणं आज देखील कर्ड क्लासिक सॉंग म्हणून ओळखले जाते ही कमाल आर डी बर्मन ची होत होतीच पण रणजीत गजमेर तथाकांच्या यांनी वाजवलेल्या मादलची देखील होती.