Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

लग्नघटिका समीप आली! मालिका विश्वातील आणखी एक अभिनेता अडकणार लग्नबंधनात; समोर आले खास फोटो !

 लग्नघटिका समीप आली! मालिका विश्वातील आणखी एक अभिनेता अडकणार लग्नबंधनात; समोर आले खास फोटो !
Siddharth Khirid Girlfriend
टीव्ही वाले मिक्स मसाला

लग्नघटिका समीप आली! मालिका विश्वातील आणखी एक अभिनेता अडकणार लग्नबंधनात; समोर आले खास फोटो !

by Team KalakrutiMedia 22/01/2026

मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचा माहोल पाहायला मिळतो आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. सोहम बांदेकर आणि स्वानंद केतकर यांच्या पाठोपाठ आता लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ खिरीड (Siddharth Khirid) देखील लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची तारीख जाहीर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. याआधी त्याने गोव्याच्या समुद्रकिनारी आपल्या गर्लफ्रेंडला अगदी फिल्मी अंदाजात प्रपोज केल्यामुळेही तो चांगलाच चर्चेत आला होता. यंदाचं वर्ष अनेक मराठी कलाकारांसाठी खास ठरत असून अनेकांच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.(Siddharth Khirid Wedding)

Siddharth Khirid Wedding
Siddharth Khirid Girlfriend

अलीकडेच अभिनेत्री रसिका वाखारकर (Rasika Wakharkar)आणि शुभंकर उंबनानी (Shubhankar Umbanani) यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता सिद्धार्थ खिरीडच्या घरीही लग्नाची लगबग सुरू झाली आहे. नुकताच सिद्धार्थ आणि त्याची होणारी पत्नी मैथिली भोसेकर (Maithili Bhosekar) यांचा मेहंदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या खास सोहळ्याचे काही सुंदर फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. मेहंदीच्या कार्यक्रमासाठी दोघांनीही जांभळ्या रंगाची आकर्षक पोशाख परिधान केली होती. मैथिलीच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी रेखाटलेली दिसत असून या फोटोंमध्ये त्यांच्या आनंदी आणि प्रेमळ क्षणांची झलक पाहायला मिळते.

Siddharth Khirid Wedding
Siddharth Khirid Girlfriend

सिद्धार्थ खिरीड लवकरच डॉ. मैथिली भोसेकर हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात आणि त्यांचं नातं घट्ट झालं आहे. मैथिली ही केवळ डॉक्टरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेली मॉडेलदेखील आहे. तिने परदेशात पार पडलेल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा मानाचा किताब पटकावला होता. इतकंच नव्हे तर ती पॅरिस फॅशन वीकमध्येही झळकली असून तिची निवड सिग्नेचर मॉडेल म्हणून झाली होती. (Siddharth Khirid Wedding)

==========================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा पाटील  बॉयफ्रेंडच्या आठवणींनी झाली भावूक!

==========================

सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांसह चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याआधी त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटमधील वेस्टर्न लूकनेसुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘फ्रेशर्स’, ‘मुलगी झाली हो’ आणि ‘राणी मी होणार’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून सिद्धार्थ खिरीड घराघरात पोहोचला. आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं असून आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील हा नवा टप्पा चाहत्यांसाठीही खास ठरत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Celebrity Wedding News Marathi Entertainment Marathi Actor Marriage News Marathi entertainment industry Marathi Serial Actor Wedding Marathi Television News Marathi TV Actor Wedding Mehendi Ceremony Photos Siddharth Khirid Wedding TV Actor Wedding Updates Wedding Bells Marathi Actor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.