Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Bigg Boss Marathi 6: टभाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा, बंद करा’ रितेश ने रुचिताला दाखवला बाहेरचा रस्ता
बिग बॅास मराठी ६ (Bigg Boss Marathi) च्या सहाव्या पर्वात सध्या वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. या रिअॅलिटी शोमध्ये दर आठवड्याला होणारा ‘भाऊचा धक्का’ हा भाग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरतो. आठवडाभरातील टास्क, वाद, मैत्री आणि मतभेद यांचा सविस्तर आढावा घेतला जातो. चांगल्या कामगिरीचं कौतुक केलं जातं, तर चुकीच्या वर्तनावर थेट आणि कठोर शब्दांत सुनावलं जातं.(Bigg Boss Marathi 6)

यावेळी मात्र सूत्रसंचालक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा संताप अनावर झालेला दिसतो. त्यांचा रोष स्पर्धक रुचिता जाधव (Ruchita Jadhav) हिच्याकडे वळलेला आहे. एका भागात रुचिताने दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांच्या समोर “आ थू” अशी प्रतिक्रिया दिल्याचं दाखवण्यात आलं. या कृतीमुळे घराबाहेरही चर्चा रंगली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘भाऊचा धक्का’मध्ये या मुद्द्यावर थेट प्रश्न उपस्थित करत रितेश म्हणाले, “रुचिता तुम्ही दिपाली यांच्यासमोर आ थू असं केलं.” रुचिता मध्येच बोलण्याचा प्रयत्न करताच त्यांनी तिला थांबवत स्पष्ट केलं, “मी बोलतो आहे ना.” पुढे त्यांनी कठोर शब्दांत सुनावत म्हटलं, “तुम्ही जे केलं आहे ते महाराष्ट्रातल्या कोणत्याच आईला आवडलं नाही आहे.” रुचिताच्या हावभावांमुळे वातावरण आणखी चिघळलं. संतप्त होत रितेश म्हणाले, “हे असे एक्स्प्रेशन द्यायचे असतील तर आत जा, भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. उठा आणि निघा.” शेवटी त्यांचा “बंद करा” असा आदेशही ऐकू आला. (Bigg Boss Marathi 6)
===================================
===================================
या घटनेनंतर घरातील समीकरणं बदलणार का ? रुचितावर काही कठोर कारवाई होणार का,? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आगामी भागात या वादाचा नेमका काय शेवट होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार ही आहे.