OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Bigg Boss Marathi 6: ‘मी तिच्या आयुष्यातून निघालो तरचं…’ घराबाहेर येताच आयुषने सांगितलं तन्वीसोबतच्या दुराव्याचं खरं कारण…
‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi 6) मधील अलीकडच्या ’वर झालेल्या एलिमिनेशनने घरातील समीकरणेच बदलून टाकली. आयुष संजीव (Aayush Sanjeev) आणि करण सोनवणे (Karan Sonawane) या दोघांचा प्रवास इथेच थांबला. घराबाहेर पडल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत आयुषने मात्र अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या विशेषतः तनवीसोबतच्या नात्याबाबत.घराच्या सुरुवातीच्या आठवड्यांत आयुष आणि तनवी यांची मैत्री प्रेक्षकांना ठळकपणे जाणवत होती. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत, चर्चा करत आणि गेमस्ट्रॅटेजी शेअर करताना दिसत होते. मात्र शेवटच्या काही दिवसांत त्यांच्या नात्यात स्पष्ट अंतर दिसू लागलं.(Bigg Boss Marathi 6)

याबाबत बोलताना आयुषने सांगितलं की, सुरुवातीला दोघांच्याही वेगवेगळ्या मित्रमंडळी होती. त्याचं स्वतःचं ग्रुपशी घट्ट नातं होतं आणि तो अनेकांमध्ये आपली ऊर्जा विभागत होता. पण तनवीचा ग्रुप तुटल्यानंतर तिच्यासाठी आयुषच मुख्य आधार बनला. इथूनच समीकरण बदलू लागलं. आयुषच्या मते, तनवीकडून येणारी भावनिक अपेक्षा वाढू लागली होती. पंचिंग बॅग टास्कदरम्यान त्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. त्याच्या म्हणण्यानुसार, तो ज्या पद्धतीने मैत्रीकडे पाहत होता, त्याच तीव्रतेने तनवी त्या नात्याकडे पाहत होती. ही असमानता पुढे गैरसमजांना कारणीभूत ठरू शकते, अशी त्याची भावना होती. म्हणूनच त्याने स्वतःहून एक पाऊल मागे घेतलं. त्याच्या शब्दांत, “कधी कधी दूर जाणं हेच समोरच्याच्या भल्यासाठी योग्य असतं.”

Aashiqui 2चा संदर्भ देत आयुषने सांगितलं की, जसं त्या चित्रपटात नायक शेवटी नायिकेच्या भल्यासाठी तिच्या आयुष्यातून दूर होतो, तसाच निर्णय त्याने घेतला. त्याला वाटलं की तो बाजूला झाल्यावर तनवीला नव्या नात्यांची आणि ग्रुपची संधी मिळेल.आयुष घरातून बाहेर पडल्यावर तनवीचं राकेश आणि दिपालीसोबतचं बॉण्डिंग अधिक मजबूत झालं, हेही त्याने नमूद केलं. त्याच्या मते, त्याने घेतलेला निर्णय तिघांसाठी फायदेशीर ठरला. नात्यात अंतर आलं असलं तरी आयुषने तनवीच्या खेळाचं कौतुक केलं. ती एक सक्षम आणि हुशार स्पर्धक असल्याचं सांगत त्याने तिला टॉप ३मध्ये पाहतो, असं स्पष्ट केलं. (Bigg Boss Marathi 6)
============================
============================
घरातील नाती, रणनीती आणि भावनिक गुंतागुंत यामुळे ‘बिग बॉस मराठी ६’चा खेळ अधिकच रंगतदार होत आहे. आयुषच्या या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांना घरातील पडद्यामागची बाजू समजली असली, घराबाहेर आल्यानंतर तन्वी यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.