OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

संगीतकार ओ पी नय्यर आणि अभिनेता दिग्दर्शक Guru Dutt!
संगीतकार ओ पी नय्यर यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. अतिशय प्रतिभावान, स्वाभिमानी आपल्या मूल्यांची अजिबात तडजोड न करणारा पण काहीसा तापट असा हा संगीतकार. त्यामुळे गुणवत्ता असून ही त्यांचं कोणत्याही गीतकार/ निर्माता/ दिग्दर्शक यांच्या सोबत लॉन्ग टर्म असोसिएशन राहिले नाही. ओ पी नय्यर हे खूप इगोस्टिक होते. त्यांच्या परखड वक्तव्यामुळे त्यांनी शत्रूच जास्त निर्माण केले. अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या सोबत ओपी यांनी काही चित्रपट केले होते. इनफॅक्ट गुरुदत्तच्या ‘आरपार’ (1954) या चित्रपटापासूनच ओ पी नय्यर हे संगीतकार म्हणून प्रस्थापित झाले.
ओपी यांनी आपल्या संगीतकार कारकीर्दीची सुरुवात 1952 सालच्या ‘आसमान’ या चित्रपटापासून केले. यानंतर त्यांचा दुसरा चित्रपट होता छम छम छम या दोन्ही सिनेमाला फारसे यश मिळालं नाही. यानंतर गुरुदत्त फिल्म्स चा ‘बाज’ हा चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केला. संगीत चांगलं असून देखील ‘बाज’ अयशस्वी चित्रपट ठरला. ओपी आपला गाशा गुंडाळून मुंबई सोडून जायला निघाले पण गुरुदत्त यांनीच त्यांना अडवले आणि आपला नवीन चित्रपट ‘आरपार’ याचे संगीत त्यांच्याकडे दिले. पाश्चात्य शैलीच्या संगीतामुळे ‘आरपार’ सुपर डुपर हिट झाला. मुहोब्बत कर लो जी भरलो, एलो मै हारी पिया, कभी आर कभी पार लागा तीरे नजर, सुन सुन सुन जालिमा, बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना, मुहोब्बत करलो जी भरलो या गाण्यांनी ‘आरपार’ सुपर हिट ठरला. गुरुदत्त आणि ओपी यांची दोस्ती इथेच झाली.

यानंतर 1955 सालच्या मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह या गुरुदत्त मधुबालाच्या चित्रपटाला ओपी चेच संगीत होती. या सिनेमातील गाणी देखील बेफाम बनली होती. विशेषत: ‘इधर तुम हंसी हो उधर दिल जवां है’, ‘जाने कहां मेरा जिगर गया जी, या गाण्याला कहर लोकप्रियता मिळाली. 1956 सालचा ‘सीआयडी’ या गुरुदत्त फिल्म्स च्या सिनेमाला ओपी चे संगीत होते. यातील ‘ऐ दिल है मुश्किल जीना यहां ‘ या गाण्याला त्या वर्षीचे बिनाका सर्वोत्कृष्ट गीतांचा सन्मान मिळाला. गुरु आणि ओपी दोघेही प्रतिभावान त्यामुळे क्रिएटिव्ह डिफरन्स हॉट होते. दोघेही आपापल्या तत्वावर ठाम असल्याने या दोन प्रतिभावंतांनी एकत्र नांदणे शक्य च नव्हते. त्या मुळे सी आय डी नंतर दोघे वेगळे झाले
या नंतर गुरूच्या प्यासा (1957) आणि कागज के फूल (1959) ला एस डी बर्मन, चौदहवी का चाँद (1960) ला रवि तर साहिब बीवी और गुलाम (1962) ला हेमंतकुमार यांचे संगीत होते. गुरुदत्तचा साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट 1962 साली प्रदर्शित झाला याच काळात गुरू दत्त ने बहारे फिर भी आयेगी या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. खरं तर या सिनेमाला संगीत आधी एस डी देणार होते त्यानी एक गाणे रेकॉर्ड देखील केले होते. पण त्यांची तब्येत बिघडल्याने नंतर हा सिनेमा ओ पी कडे आला. पण तो वर गुरुदत्त या दुनियेतून निघून गेला होता .
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
ओ पी नय्यर यांनी एका मुलाखतीत असे सांगितले की,” मला आयुष्यभर एका गोष्टीचा पश्चाताप होत राहील की गुरुदत्त ने मला त्या रात्री (10 ऑक्टोबर 1964) भेटायला बोलावले होते पण मी गेलो नाही जर मी वेळीच गेलो असतो तर कदाचित गुरुदत्त चे प्राण वाचले असते!” 10 ऑक्टोबर 1964 या दिवशी गुरुदत्त ने आत्महत्या केली त्या रात्री गुरुदत्त बेफाम पीत होता. अब्रार अलवी रात्री बारा साडेबारा वाजता गुरुच्या घरातून बाहेर पडले त्यानंतर देखील गुरुदत्त यांची पिणे चालूच होते. याच वेळी रात्री दोन वाजता ओ पी यांच्या घरातील फोन वाजला.
फोन ओपी यांच्या पत्नीने घेतला. समोरून राजकपूर बोलत होता. राज कपूर ने फोन वर सांगितले,” ओपी यांना ताबडतोब गुरुदत्त त्यांच्याकडे पाठवा. त्याचे भयंकर दारू पिणे चालू आहे आणि तो सतत रडत आहे आणि मला ओपीला भेटायचे आहे असे सांगत आहे.” ओपी ला गुरुदत्त च्या पिण्याबद्दल माहीत होते. पिल्यानंतर तो जास्तच इमोशनल होतो हे देखील माहिती होते. म्हणून त्याने दुर्लक्ष केले आणि सकाळी भेटूत असे ठरवले. सकाळी दहा वाजता ओपी गुरुदत्त यांना भेटायला त्यांच्या घरी गेला. त्याच वेळी अब्रार जिना उतरून खाली येत होता त्याने ओपीला पाहिल्या नंतर सांगितले “ आपला गुरु गेला!” तेव्हा ओपी ने विचारले “कुठे गेला?” तेव्हा अब्रार ने आभाळाकडे बोट करून सांगितले ‘गुरु गेला!” ओ पी च्या पाया खालची जमिनी सरकली. तो आत गेला. आत गुरुदत्त चे अचेतन शरीर शुभ्र वस्त्रात गुंडाळलेले दिसले. शांत झोप लागल्यासारखा गुरुदत्त दिसत होता. ओपी यांनी नंतर एका मुलाखतीत नंतर सांगितले ,” जर कदाचित त्या रात्री मी राज कपूरचा फोन नुसार गुरुदत्त यांना भेटायला गेलो असतो तर कदाचित गुरु दत्तचे प्राण वाचवू शकलो असतो!”