Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!
अभिनेता धर्मेंद्र सुरुवातीपासूनच लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते होते. सिनेमात येण्यापूर्वी पासूनच त्यांना लताला भेटण्याची आस होती. साठच्या दशकात ते सिनेमात काम करू लागले. लता मंगेशकर यांची पहिल्यांदा भेट ‘अनपढ’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला झाली. त्यावेळी धर्मेंद्र प्रचंड आनंदात होते कारण जो आवाज ऐकत ते मोठे झाले होते त्या स्वराला प्रत्यक्ष गाताना पाहण्याची संधी त्यांना लाभली होती. गाण्याचे बोल होते ‘आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे..’ त्या दिवशी धर्मेंद्र खूप उत्साहात होते. लता मंगेशकर यांच्याशी ते खूप भरभरून बोलत होते. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी आपल्या शंभर हून अधिक मित्रांना चक्क पत्र पाठवून आपल्या लताच्या भेटीचा वृतान्त काळविला! त्या रात्री धर्मेंद्र ने जागून शंभर पत्र लिहिली आणि दुसऱ्या दिवशी स्वत: पोस्ट केली !

‘अनपढ’ हा चित्रपट मोहन कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात धर्मेंद्रची नायिका माला सिन्हा होती. खरं तर या चित्रपटाचे निर्मात्यांना हे गाणे अजिबात आवडले नाही. त्यांना हे गाणे खूपच संथ वाटले होते. त्यामुळे हे गाणे चित्रपटातून ड्रॉप करावे या विचारापर्यंत ते आले होते. परंतु अभिनेता धर्मेंद्र आणि संगीतकार मदन मोहन यांनी त्याला विरोध केल्यामुळे हे गाणे चित्रपटात राहिले. अभिनेता धर्मेंद्र चा पाचवा चित्रपट . या पूर्वी त्याचे चार सिनेमे प्रदर्शित झाले होते. दिल भी तेरा हम भी तेरे , शोला और शबनम , बॉय फ्रेंड, सूरत और सीरत. ‘अनपढ’ हा धर्मेंद्र चा तसा पहिला सुपर हिट सिनेमा. 1 जुलै 1962 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चांगला यशस्वी झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप गाजली. परंतु सर्वात गाजले ते हेच गाणे ‘आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे’ हे गाणे राजा मेहंदी अली खान यांनी लिहिले होते आणि ‘यमन ‘ या रागावर संगीतकार नेते स्वरबद्ध केले होते.

या गाण्याची महती इथेच संपत नाही. या चित्रपटानंतर जवळपास 40- 45 वर्षांनी देखील लता मंगेशकर यांना या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे प्रसंग आठवत होता. एका कार्यक्रमात लता च्या हस्ते धर्मेंद्र ला अवॉर्ड देण्यात येणार होते. या कार्यक्रमात लता ने या गाण्याची आठवण केली आणि त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग ला धर्मेंद्र पीच कलरचा शर्ट घालून आले होते याची आठवण करून दिली! धर्मेंद्रला खूप आश्चर्य वाटले आणि आनंद देखील वाटला की इतक्या वर्षानंतर देखील लता मंगेशकर यांना आपला तो पीच कलरचा शर्ट आठवत होता! या सिनेमातील लता ची इतर चार गाणी ‘है इसी में प्यार की आबरू’, ‘वो देखो जला घर किसी का ‘, ‘रंग बिरंगी राखी लेके ‘, ‘जिया ले गयो जी मोरा सावरीया’ ही चार ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. संगीतकार नौशाद यांचे ‘जिया ले गयो जी मोरा सावरीया’ हे अत्यंत आवडीचे गाणे होते ते एकदा मदन मोहन यांना म्हणाले होते माझी सर्व गाणी तुम्ही घ्या आणि तुमचे फक्त हे एक गाणे मला द्या.
================================
हे देखील वाचा : Amitabh Bachchan यांच्या जंजीर चित्रपटाशी असलेलं धर्मेंद्रचं कनेक्शन!
================================
धर्मेंद्र यांच्या सोशल मीडियावरील सर्व पोस्ट लता मंगेशकर फॉलो करत होत्या एकदा एका पोस्टमध्ये धर्मेंद्रने खूप निराशा जनक विचार व्यक्त केले होते. लता मंगेशकर यांनी त्यांना ताबडतोब फोन करून सांगितले की,”धरमजी , काय झाले? तुम्ही या देशातील तरुणांचे नायक आहात. तुम्हाला इथले तरुण फॉलो करतात. त्यामुळे तुम्ही अशी निराशा जनक विचार पोस्ट टाकू नका. तुम्हीच जर निराश झाला की इथल्या तरुणांनी कुणाकडे पहायचे? हा किस्सा धर्मेंद्र यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता. संगीतकार मदन मोहन यांना पण या सिनेमासाठी आपल्याला पुरस्कार मिळेल याची खूप खात्री होती परंतु नॉमिनेशन मिळून देखील या सिनेमाला संकर पुरस्कार मिळाला नाही. संगीतकार मदन मोहन यांना ‘अनपढ’ या सिनेमासाठी संगीता करीताचा फिल्म फेअर पुरस्कार मिळेल याची खूप खात्री होती. नॉमिनेशन मिळाले होते पण पुरस्कार मिळाला नाही. संगीतकार मदन मोहन खूप नाराज झाले होते.