‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘एक चतुर नार…’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर मन्ना डे का नाराज झाले होते?
तो काळ होता किशोर कुमार, मुकेश, रफी, मन्ना डे (Manna Dey), महेंद्र कुमार, येसूदास अशा दिगग्ज गायकांचा. हे सर्व गायक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. त्यावेळी कित्येकांमध्ये किशोर श्रेष्ठ की रफी, किशोर श्रेष्ठ की मुकेश असा वाद होत असत. अत्यंत ‘मेलोडियस’ असा तो काळ होता. असो. आजच्या लेखाचा विषय किशोर कुमार आणि रफी नाही तर, किशोर कुमार आणि मन्ना डे (Manna Dey) हा आहे.
मन्ना डे म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रातला एक सुरेल प्रवास, तर किशोर कुमार म्हणजे भारतीय संगीतातलं एक सोनेरी पान. हिंदी, मराठी, बंगालीसह भारतातील एकूण १८ भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या दोन दिग्गज गायकांची गाणी आजच्या काळातही आवडीने ऐकली जातात. (Manna Dey)
उडत्या चालीची गाणी असोत वा हळुवार प्रेमगीते किशोर कुमार यांची गाणी तेव्हा प्रचंड लोकप्रिय होत होती. तर, मन्ना डे यांची शास्त्रीय संगीताचा साज चढवलेली गाणी कानसेनांच्या कानांना तृप्त करत होती. (Manna Dey)
तमन्ना (१९४२) चित्रपटातील “जागो आयी उषा” या गाण्यापासून आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीची सुरवात करणारे मन्ना डे शास्त्रीय संगीताचे पुजारी होते. तर किशोरजींनी संगीताचं कुठलंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नव्हतं. मन्ना डे यांचं खरं नाव होतं प्रबोध चंद्र डे, तर किशोर कुमार यांचं मूळ नाव आभास कुमार गांगुली. गंमत म्हणजे दोघेही बंगाली. (Manna Dey)
मन्ना डे जसे उत्तम गायक होते, तसेच ते उत्तम नकलाकारही होते. किशोर कुमार यांनीही अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. हे दोघे सर्वात पहिल्यांदा एकत्र आले ते ‘पडोसन’ चित्रपटातील “एक चतुर नार…” या गाण्याच्या निमित्ताने! लोकांसाठी हे गाणं मन्ना डे आणि किशोर कुमार यांचं नव्हतंच मुळी. त्यांनी ‘एन्जॉय’ केली “मास्टरजी आणि विद्यापथी” यांची जुगलबंदी! या गाण्याबद्दलचा एक रंजक किस्सा आहे. (Manna Dey)
“एक चतुर नार…” हे गाणं गाण्यासाठी सुरुवातीला मन्ना डे तयार नव्हते. त्यासाठी त्यांची खूप मिनतवारी करावी लागली. अर्थात कोणताही गायक मास्टरजींसाठी गाणं गायला सहजी तयार झाला नसताच. याचं मुख्य कारण म्हणजे या गाण्यामध्ये मास्टरजी विद्यापथींकडून हरताना दाखविण्यात आलं आहे. आपण गाण्यामध्ये हरलो, हे कुठला गायक मान्य करेल? त्यात मन्ना डे यांच्यासारखा शास्त्रीय संगीताचा भक्त असं काही करणं शक्यच नव्हतं. (Manna Dey)
मन्ना डे नकलाकार होते. गाणं गाताना भूमिका समजून घेऊन त्या टोनिंगमध्ये गायची कला त्यांना सहज जमत असे. त्यामुळेच तर त्यांच्या गाण्यामधले भाग अधिक उत्कटतेने प्रकट होत असत. त्यामुळे मेहमूद यांना काहीही करून मास्टरजींसाठी मन्ना डेंचाच आवाज हवा होता.(Manna Dey)
====
हे देखील वाचा: किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!
====
मन्ना डे तयार होत नाहीत म्हटल्यावर अखेर स्वतः मेहमूद त्यांना भेटायला गेले आणि त्यांना समजावताना म्हणाले, “मास्टरजी हरणं ही कथानकाची गरज आहे. गाण्याचा अथवा कलेचा त्याच्याशी संबंध नाही. चित्रपटात नाही का, अगदी किरकोळ देहयष्टीचा हिरो धष्टपुष्ट दिसणाऱ्या व्हिलनला मारतो; तसंच आहे हे”, असं म्हणून महत्प्रयासाने त्यांनी मन्ना डे यांना गाण्यासाठी तयार केलं.(Manna Dey)
मन्ना डे गाण्यासाठी तयार झाले खरे पण रेकॉर्डिंग होईपर्यंत मेहमूद यांना धास्ती होती. अखेर रेकॉर्डिंगचा दिवस उजाडला. गाणं एकदम भन्नाट जमून आलं. रेकॉर्डिंग नंतर मात्र मन्ना डे काहीसे नाराज झाले आणि म्हणाले, “ये ठीक नही हैं, एक शास्त्रीय गायक कैसे किसीसे हार सकता हैं? (Manna Dey)
हे ऐकल्यावर तिथे असणारे सगळेच शांत झाले. कोणाला काय बोलावं काही कळेना. तेवढ्यात किशोर कुमार प्रसंग सावरून घेत म्हणाले, “दादा, मैं आपसे कैसे जीत सकता हू? आप थोडे ही हारे है, हारे तो मास्टरजी हैं?”(Manna Dey)
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
किशोरजींचं बोलणं मन्ना डे यांना पटलं. यानंतर मात्र त्यांनी कधीही कुठलीही तक्रार केली नाही. गाणं तर सुपरहिट झालंच. पण या निमित्याने किशोर कुमार यांची नम्रता आणि मन्ना डे यांच्या शास्त्रीय संगीताचे प्रेम पुन्हा एकदा सर्वांसमोर आलं. पुढे हे दोघे “ये दोस्ती हमी नहीं छोडेंगे” म्हणत पुन्हा एकदा एकत्र आले होते.