‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
या 7 हिंदी चित्रपटांसाठी निवड करण्यात आलेल्या कलाकारांना अचानक काढून टाकण्यात आले
काही दिवसांपूर्वीच तुम्ही बातमी पहिली असेल की, कार्तिक आर्यन या आघाडीच्या अभिनेत्याला ‘दोस्ताना २’ चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे. पडद्यामागे असं काय घडलं की, ज्यामुळे कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला? अर्थात यामागचं कारण जरी स्पष्ट झालं तरी ते खरं असेलच असं नाही.
चित्रपटसृष्टीमध्ये अनेकदा एक कलाकाराला भूमिकेची ऑफर मिळते, पण प्रत्यक्षात ती भूमिका दुसऱ्याच कलाकाराला देण्यात येते. अनेकदा कलाकारांच्या या आगमन – निर्गमनाची खरी कारणे आपल्यासमोर येतातच असं नाही. अशाच काही कलाकारांच्या आगमन – निर्गमनाची माहिती घेऊया (Removed from Bollywood Movies)
१. रेस ३ – सैफ अली खान
‘रेस’ चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात प्रमुख भूमिकेत असलेल्या सैफ अली खानने दर्जेदार भूमिका केली होती. त्याच्या अभिनयामुळे हे दोन्ही चित्रपट (भाग १ आणि २) सुपरहिट झाले होते.
रेस चित्रपटाच्या तिसऱ्या भागात सैफ अली खानला डावलून सलमान खानला घेण्यात आले होते. तसंच तिसऱ्या भागात दिग्दर्शक अब्बास मस्तान यांच्या जागी रेमो डिसूजा यांची निवड करण्यात आली. याचं खरं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. (Removed from Bollywood Movies)
२. पाणी – सुशांत सिंग राजपूत
चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुशांत सिंग राजपूतला ‘पाणी’ चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते.या चित्रपटाची कहाणी भविष्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर आधारित होती.
या चित्रपटासाठी सुशांत प्रचंड मेहनत घेत होता. त्याने यासाठी आपले वजनही कमी केले होते. परंतु, ‘बिग बजेट’ चित्रपट सुशांत सोबत करण्यास निर्मात्यांनी नकार दिल्याने सुशांतला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. यानंतरच सुशांत नैराश्याच्या गर्तेत गेला. (Removed from Bollywood Movies)
३. विकी डोनर – राधिका आपटे
विकी डोनर चित्रपटात राधिका आपटेला घेण्यात येणार होते. त्या चित्रपटात तिची निवड मुलाखतीशिवाय करण्यात आली होती. राधिकाने जेव्हा चित्रपटाची कथा वाचली तेव्हा तिला ती आवडली आणि तिने चित्रपटासाठी होकार कळवला.
चित्रपटासाठी राधिकाला वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला. पण नंतर अचानक तिला न घेता यामी गौतमला घेण्यात आले होते. यामीच्या कारकिर्दीतील हा पहिलाच चित्रपट होता.
४. पती पत्नी और वो – तापसी पन्नू
२०१९ मध्ये आलेल्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटामध्ये तापसी पन्नूच्या जागेवर भूमी पेडणेकरला घेण्यात आले होते. सुरुवातीला या चित्रपटासाठी तापसीकडे विचारणा करण्यात आली होती. तिच्याकडे शूटिंगसाठी उपलब्ध असणाऱ्या तारखांसाठीही विचारणा करण्यात आली होती. परंतु, चित्रपटाचे शूटिंग चालू व्हायच्या आधी तिच्या जागी भूमी पेडणेकरला घेण्यात आले.
नाननंतर नाराज होऊन तापसीने सांगितले की, या चित्रपटाच्या तयारीत माझा बराचसा वेळ निघून गेला. चित्रपट निर्मात्यांनी मात्र याबद्दल बोलताना सांगितले की, आम्ही फक्त तापसीला चित्रपटाची कथा ऐकवली होती. बाकी कुठलंही बोलणं झालं नव्हतं.
५. कबीर सिंग – अर्जुन कपूर
‘कबीर सिंग’ या चित्रपटातील शाहिद कपूरच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. परंतु, या चित्रपटासाठी शाहिद कपूरच्या आधी अर्जुन कपूरला विचारण्यात आले होते. अर्जुनाची निवड जवळपास निश्चित झाली होती. पण कबीर सिंग चित्रपटाचे चित्रपटाचे निर्माते संदीप रेड्डी यांना शाहिद कपूर कबिरच्या भूमिकेसाठी योग्य वाटल्यामुळे ही भूमिका शाहिदला मिळाली.
६. कॅटरिना कैफ – साया
कॅटरिना कैफ जॉन अब्राहम सोबत साया चित्रपटात एकत्र काम करणार होती. पण जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग चालू झाली तेव्हा तारा शर्मा या अभिनेत्रीला कतरिनाच्या जागेवर घेण्यात आले.
=====
हे देखील वाचा: विद्या बालन सगळ्यांपेक्षा वेगळी, म्हणूनच यशस्वी.
=====
यानंतर प्रसारमाध्यमांमधून असे चित्र दाखवण्यात आले की, जॉन अब्राहम मुळे कतरिनाला काढून टाकण्यात आले आहे. मात्र खरे कारण म्हणजे कतरिनाला हिंदी येत नसल्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
७. सायना नेहवाल – श्रद्धा कपूर
सायना नेहवालच्या जीवनकथेवर आधारित असणाऱ्या ‘सायना’ चित्रपटात आधी श्रद्धा कपूर काम करणार होती. परंतु, तिला डेंग्यूची लागण झाल्याने ती एक महिना सुट्टीवर होती.
====
हे देखील वाचा: चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण
====
जेव्हा श्रद्धा आजारातून बरी झाली तेव्हा तिने स्ट्रीट डान्सर ३ चे शूटिंग चालू केले आणि तिच्या जागेवर परिणीती चोप्राने हा चित्रपट पूर्ण केला. (Removed from Bollywood Movies)
काही वेळा चित्रपटांमधून काढून टाकल्यानंतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री बॉयकॉट होण्याच्या भीतीने याबद्दल जाहीर वाच्यता करत नाहीत, तर काही वेळा उघडपणे नाराजी व्यक्त करतात. कलाकार वाच्यता करोत अथवा न करोत बॉलिवूडमधल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा तर होणारच!
–विवेक पानमंद