प्रेग्नन्सीमध्ये सोनम कपूरच्या सौंदर्यात पडली अधिकच भर, खास फोटोशूट करत फ्लॉन्ट केले बेबी बंप
बॉलिवूडची फॅशन क्वीन म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर नेहमीच तिच्या अमेझिंग अशा फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. विविध कार्यक्रमांसाठी जेव्हा सोनम उपस्थित राहते तेव्हा तिची आणि तिच्या फॅशनचीच जास्त चर्चा होताना दिसते.
आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक लाइमलाईट तिला तिच्या उत्तम फॅशनसेन्सने मिळवून दिले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सोनम जरा वेगळ्याच गोष्टीमुळे प्रकाशझोतात आली आहे. लवकरच सोनम आई होणार असून, काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. आता नुकतेच सोनमने तिचे एक प्रेग्नन्सी फोटोशूट केले असून, त्या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोनम कपूर नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. या माध्यमातून ती तिच्या फॅन्ससोबत संपर्कात राहून तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील विविध अपडेट देत सर्वांना देत असते.
नुकतेच सोनमने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने केलेल्या फोटोशूटचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत. या प्रेग्नन्सी फोटोशूटमध्ये सोनम नेहमीसारखी कमाल दिसत असून, तिच्या फोटोंमधले तिचे लूक खूपच लक्ष वेधून घेत आहेत.
सोनमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसलेली दिसत असून, त्यावर तिने एक लॉन्ग नेकपीस, कानात हेव्ही इयररिंग, हातात बांगड्या आणि पायात मोजडी घातलेली दिसत असून, यावर तिने एकदम साधा मात्र आकर्षक मेकअप केला आहे.
या फोटोंमध्ये तिला एक पिरियड लूक देण्यात आला असून, सोनमला हा लूक देण्यासाठी तिची बहीण रिया कपूरने तिला मदत केली आहे. सोनमच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या आणि कलाकारांच्या प्रचंड कमेंट्स येत असून, सर्वांनाच तिचा हा हटके लूक आवडताना दिसत आहे.
सोनम सध्या तिचा प्रेग्नन्सी काळ चांगलाच एन्जॉय करताना दिसत असून, यासोबतच ती काम देखील करत आहे. सोनम कपूरने २०१८ साली दिल्लीमधील व्यायसायिक असलेल्या आनंद आहुजासोबत लग्न केले होते. त्यानंतर अनेकदा सोनम प्रेग्नेंट असल्याच्या अफवा देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र त्या बातम्यांना सोनमने अफवा सांगून लक्ष न देण्यास सांगितले होते. सोनमने प्रेग्नन्सी जाहीर केल्यानंतर ती तिच्या बाळाला ऑगस्ट २०२२ मध्ये जन्म देणार असल्याचे सांगितले जात आहे.
सोनम कपूरबद्दल सांगायचे झाले तर, तिने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन राणी मुखर्जी अभिनित ‘ब्लॅक’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर २००७ साली संजय लीला भन्साळी यांनी तिला त्यांच्या ‘सांवरिया’ सिनेमातून मोठा ब्रेक दिला.
याच सिनेमातून तिने आणि रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सोनमने ‘आयेशा’, ‘रांझना’, ‘नीरजा’, ‘एक लडकी को देखा तो’ आदी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम करत तिच्यातील सशक्त अभिनेत्रीला सिद्ध केले.