राम गोपाल वर्मा यांचा घटस्फोट उर्मिला मातोंडकरमुळं झाला होता?
‘रंगीला’, ‘सत्या’, ‘शूल’, ‘कंपनी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक असलेले राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आज ७ एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस असतो. चला जाणून घेऊया, त्यांच्या आयुष्याशी संबंधित अशा काही गोष्टी, ज्यांच्यामुळे ते खूप चर्चेत राहिले आहेत.
रोज सकाळी १०-१५ मिनिटे पाहतात ऍडल्ट कंटेंट
राम गोपाळ वर्मा (Ram Gopal Varma) यांनी काही वर्षांपूर्वी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ते रात्री २ किंवा ३ वाजेपर्यंत झोपत नसले, तरी सकाळी ६ च्या आधी उठतात. ते उठताच पहिले १० किंवा १५ मिनिटे कोणतीही ऍडल्ट कंटेंट पाहतात. त्यांनी सांगितले होते की, जर त्यांना सकाळी कोणताही ॲडल्ट व्हिडिओ किंवा डॉक्युमेंटरी पाहतात. सकाळी ॲडल्ट कंटेंट पाहण्यामागील कारण म्हणजे, हा कंटेंट त्यांना उत्तेजित करतो आणि शरीराच्या रासायनिक अभिक्रियामुळे त्यांची ऊर्जा दिवसभर टिकून राहते.
उर्मिला मातोंडकरमुळे राम गोपाल वर्माचा झाला त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट?
राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे उर्मिता मातोंडकरसाठी इतके वेडे होते की, त्यामुळेच त्यांनी पत्नीशी संबंध तोडण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीने उर्मिलाला कानाखाली मारल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. उर्मिलाच्या वेडेपणाने दिग्दर्शकावर इतके वर्चस्व गाजवले की, त्यांनी माधुरी दीक्षितलाही चित्रपटातून काढून टाकल्याचे बोलले जाते. उर्मिलामुळेच राम गोपाल वर्माने पत्नीपासून घटस्फोट घेतल्याबद्दल इंडस्ट्रीत आजही बोलले जाते.
तासन् तास उभे राहायचे श्रीदेवींच्या घराबाहेर!
राम गोपाल वर्मा श्रीदेवीचे जबरदस्त फॅन होते. श्रीदेवीसोबतचा त्यांचा प्रवास ‘शिवा’ या चित्रपटाने सुरू झाला. त्यानंतर ते चेन्नईतील नागार्जुनच्या कार्यालयातून निघून, श्रीदेवीचे घर जवळच आलेल्या रस्त्यावर उभे राहायचे. एक काळ असा होता, जेव्हा ते अभिनेत्री श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या घराबाहेर तासन् तास उभे असायचे.
दिग्दर्शकाला श्रीदेवींचे घर वाटायचे ‘बेकार’
राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी लिहिले की, “या बेकार दिसणार्या घरात श्रीदेवीसारखी देवी राहते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. ते मला बेकार वाटायचे, कारण श्रीदेवीसारख्या देवीसाठी कोणतंही मानवनिर्मित घर पात्र नाही.” येताना किंवा जाताना त्यांची एक झलक मिळावी म्हणून राम घराबाहेर उभे असायचे. पण तिची झलक मात्र कधीही मिळाली नाही.
वाटायचं, मी त्यांना पाहूनच मरून जाईल
यानंतर राम गोपाल वर्माचा (Ram Gopal Varma) ‘शिवा’ रिलीझ झाला आणि तो हिटही झाला. त्यानंतर निर्मात्याने त्यांना विचारले की, तुम्हाला श्रीदेवीसोबत चित्रपट बनवायचा आहे का? तेव्हा ते म्हणाले, “वेडे आहात का? मी त्यांना पाहूनच मरेन.” मात्र नंतर त्यांच्या भेटीची व्यवस्था करण्यात आली आणि निर्मात्यासोबत वर्मा श्रीदेवींच्या त्याच घरी पोहोचले. जिची झलक पाहण्यासाठी तिच्या घराबाहेर तासन् तास उभे असायचे ती त्यांना प्रत्यक्षात समोर दिसणार होती. मात्र, तेव्हाही नशिबाने त्यांची साथ दिली नाही. कारण त्यावेळी नेमके लाईट गेले आणि ते त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये वाट पाहत राहिले.