प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

शाहरुख खानवर आली राजकुमार हिरानींकडे काम मागायची वेळ… हिरानी म्हणाले, तुझ्यासाठी ‘डंकी’
राजकुमार हिरानी फिल्म्स हे बॉलिवूडच्या बड्या बॅनर्समधलं एक नाव. ‘मुन्ना भाई’, ‘पिके’, ‘संजू’, ‘३ इडियट्स’ हे हिरानींचे गाजलेले सिनेमे. त्याचं दिग्दर्शन, त्यांच्या सिनेमाची गोष्ट काही औरच असते. कॉमेडी, ड्रामा, इमोशनल सगळे फॅक्टर्स राजकुमार हिरानींच्या सिनेमात एन्जॉय करता येतात. राजकुमार हिरानींच्या सिनेमात आपण मुख्य भूमिका साकारावी अशी सगळ्याच कलाकारांची इच्छा असते. तशीच शाहरुखनेही हिरानींच्या सिनेमात काम करण्याची इच्छा स्वत: हिरानी यांच्याकडेच बोलून दाखवली आणि त्यानंतर जे झालं त्याचा व्हिडिओ शाहरुखने सोशल मीडियावर शेअर केलाय.

राजकुमार हिरानी यांच्या सिनेमात आपण संजय दत्त, आमिर खान, रणबीर कपूर यांना पाहिलं आहे. आता शाहरुख खानचं रेड चिली एन्टरटेन्मेंट आणि राजकुमारी हिरानी यांचं राज कुमार हिरानी फिल्म्स एकत्र येत एका सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाचं नाव आहे ‘डंकी’. याच ‘डंकी’ सिनेमाचा हा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.
या टीझरमध्ये शाहरुख खान राजकुमार हिरानींच्या ऑफिसमध्ये भिंतींवर लावलेल्या त्यांच्या सिनेमाचे पोस्टर बघतोय. ‘संजयला मुन्ना भाई, आमिरला पिके, रणबीरला संजू आपल्याला काय…’ असं तो स्वत:शीच पुटपुटताना दिसतो. तेवढ्यात तिथे हिरानी येतात. शाहरुख त्यांना म्हणतो ‘माझ्यासाठी असं काही असेल तुमच्याकडे तर..’ हिरानी त्यावर म्हणतात ‘एक स्क्रिप्ट आहे ना… त्यात कॉमेडी आहे, इमोशन्स आहेत आणि रोमॅन्सही आहेत… फक्त तुला तुझी सिग्नेचर स्टेप या सिनेमात नाही करता येणार…सिनेमाचं नाव आहे डंकी’
असा ‘डंकी’ सिनेमाचा हा मजेशीर टीझर शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. २२ डिसेंबर २०२३ला म्हणजेच जवळपास दीड वर्षाने हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

२०१८मध्ये शाहरुखचा ‘झीरो’ सिनेमा प्रदर्शित झाला होता, तर हिरानींचा ‘संजू’ही त्याच वर्षी प्रदर्शित झालेला. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनंतर हिरानी आणि शाहरुख त्यांचा नवा चित्रपट आणतायत तेही एकत्र. राजकुमार हिरानी आणि शाहरुख खानच्या ‘डंकी’ या आगामी सिनेमात तापसी पन्नूचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. सिनेमात तिची भूमिका कशी असेल याबद्दल अजून काहीही उघड झालेले नाही.
=====
हे देखील वाचा – कोर्ट रूम ड्रामावर आधारित ‘हे’ ८ चित्रपट आवर्जून पाहायलाच हवेत
=====
शाहरुख आणि हिरानी हे नवीन समीकरण असलेला सिनेमा कसा असेल याबद्दलची उत्सुकता या टीझरने नक्कीच वाढवली आहे. तसंच सिनेमाच्या निमित्ताने तापसी पन्नू आपल्याला शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळेल.
– वेदश्री ताम्हाणे