‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘पुष्पा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पोलिसांनी चंदनाची खरी तस्करी समजून अडवलं अन् मग…
दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. कथा कोणतीही असो त्या कथेला प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात दाक्षिणात्य दिग्दर्शक अजिबात कसलीही कसर ठेवत नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि गाण्यांचा तडका यामुळे हे चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरतात. यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा वरचष्मा आहे. अलीकडेच पुष्पा, केजीएफ, आरआरआर अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्पडतोड कमाई केली आहे. (Pushpa movie Unknown Facts)
पुष्पा चित्रपटातील कित्येक डायलॉग्ज आणि श्रीवल्ली ही गाणं, तर सुपर डुपर हिट झालं. चंदन तस्करीवर आधारित हा चित्रपट कोरोनानंतर आलेल्या चित्रपटांमध्ये ब्लॉकबस्टर हिट ठरला. टिपिकल दाक्षिणात्य चित्रपटांसारखाच हा देखील एक मसालापट होता. सुकुमार लिखित, दिग्दर्शित पुष्पा या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन, रश्मीका मंदाना, फहद फासील प्रमुख भूमिकेत होते, तर धनंजय, सुनील मंगलम, अजय घोष, राव रमेश आदी कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटामधील ‘श्रीवल्ली’ या गाण्याचे व यातील काही डायलॉग्जचे सोशल मीडियावर तयार झालेली ‘रिल्स’ सुपरहिट झाली. यामधील डायलॉग्जवरून आजही कित्येक ‘मिम्स’ तयार होत असतात. चित्रपटाची कहाणी आणि प्रदर्शनानंतरचे किस्से, तर रंजक आहेतच, पण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्याचे किस्सेही तितकेच धमाल आहेत. त्याबद्दलच थोडंसं जाणून घेऊया. (Pushpa movie Unknown Facts)
शूटिंगसाठी वापरल्या गेल्या ३०० गाड्या
‘पुष्पा’ चित्रपटातील काही भागांचं शूटिंग आंध्रप्रदेशातील ‘मारेदुमिली’ जंगलात झालं आहे. चित्रपटातील अनेक दृशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दाखवण्यात आली आहे. एक सीन तब्बल १५०० लोकांवर चित्रित करण्यात आला होता. तसंच ‘पुष्पा’ चित्रपटातील अनेक दृश्यांसाठी दररोज ५०० लोकांची गरज होती. एका गाण्यामध्ये, तर १००० लोकांना घेण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह एवढ्या सर्व लोकांना लोकेशनवर घेऊन जाण्यासाठी तब्बल ३०० वाहने लागत असत.
जंगलामध्ये बनविण्यात आला रस्ता
चित्रपटाचं चित्रीकरण जंगलामध्ये करण्यात आलं आहे. जंगलमधलं जे लोकेशन चित्रीकरणासाठी निवडण्यात आलं ते लोकेशन जंगलात खूप आतमध्ये होतं. तिथे जाण्यासाठी धड रस्ताही नव्हता. यामुळे चित्रपटामध्ये चंदन तस्करीच्या दृश्यांचे चित्रीकरण करताना निर्मात्यांना खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे जंगलामध्ये जाण्या-येण्यासाठी कच्चा बनविण्याचं कामही निर्मात्यांनी केलं. (Pushpa movie Unknown Facts)
पोलिसांनी खरी तस्करी समजून अडवलं होतं
केरळच्या जंगलात चित्रपटाचं शूटिंग चालू असताना एका दृश्यासाठी चित्रपटाचं युनिट चंदनाचं कृत्रिम बंडल घेऊन केरळच्या जंगलात गेलं. त्यावेळी पथक परतत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यावेळी टीमने मोठ्या कष्टाने पोलिसांना पटवून दिलं की, हे खरं चंदन नसून चित्रपटासाठी कृत्रिम चंदनाचं लाकूड वापरण्यात आलं होतं.
दोन तास दिले केवळ मेकअपसाठीच!
अल्लू अर्जुन या अभिनेत्याने केलेली पुष्पाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनचा लूक बदलण्यात आला होता. यासाठी त्याला मेकअपसाठी तब्बल दोन तास द्यावे लागत. तसंच मेकअप उतरवण्यासाठीही त्याला २० ते ४० मिनिटं लागत असत. (Pushpa movie Unknown Facts)
व्हिलन नाही कॉमेडियन
पुष्पा या चित्रपटात मंगलम श्रीनू नावाच्या खलनायकाची भूमिका साकारणारा सुनील हा खरंतर एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहे.
=====
हे देखील वाचा – ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाबद्दलच्या १० अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील
=====
दुसरा भाग काढायचा विचार केला नव्हता तर करावा लागला
चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं तेव्हा या चित्रपटाचे दोन भाग करायचा कोणताही विचार डोक्यात नव्हता. परंतु चित्रपटाची कहाणी एका भागात दाखवणं शक्य नाही, हे लक्षात आल्यावर दिग्दर्शकाने हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित करायचा निर्णय घेतला. आता प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. (Pushpa movie Unknown Facts)
सर्वात जास्त पाहिला गेलेला टिझर
पुष्पाचा टिझर एप्रिल २०२१ मध्येच प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्या झाल्या तो जवळपास १५ लाख लोकांनी पहिला. चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मते टॉलिवूडमधील चित्रपटांमधला हा सर्वात जास्त पहिला गेलेला टिझर आहे.