
“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंच
जगभरात ज्यांच्या गाण्यांचे करोडो चाहते आहेत ते म्हणजे ए.आर.रेहमान (A R Rehman)… आजवर साऊथसह हॉलिवूड आणि हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे… अशातच २०२५ हे वर्ष ज्या चित्रपटाने गाजवलं तो म्हणजे लक्ष्मण उत्तेकर यांच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाला रेहमान यांनी संगीत दिलं होतं… त्यांनी दिलेल्या संगीताला खरं तर संमिश्र प्रतिक्रिया लोकांकडून आल्या.. आणि आता यावर स्वत: रेहमान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे… (Bollywood Movie)
सध्या रेहमान नितेश तिवारींच्या ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाला संगीत देणार आहेत. या निमित्ताने त्यांनी बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये यांनी ‘छावा’ चित्रपटावर भाष्य केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकावरुन काही स्तरांतून हा चित्रपट समाजाला ‘विभाजित’ करणारा असल्याचं म्हटलं जात होतं. बीबीसी एशियन नेटवर्कचे पत्रकार हारून रशीद यांनी याबद्दल ए. आर. रहमान यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. (Entertainment News)

पत्रकार हारून रशीद यांनी रेहमान यांना विचारलं की, “तुम्ही ‘छावा’च्या साउंडट्रॅकवर खूप अभिमान असल्याचे म्हटले आहे आणि तो खरोखर उत्तम आहे, पण ही एक फूट पाडणारी फिल्म वाटते. यावर तुमचे काय मत आहे?” या प्रश्नावर उत्तर देताना रेहमान म्हणाले की, “हो, माझ्या मते या चित्रपटात विभाजनाचा वापर करण्यात आला आहे, पण यामागचा मूळ उद्देश शौर्य दाखवण्याचा आहे. मी सुरुवातीला दिग्दर्शकाला विचारलं होतं की, या चित्रपटासाठी तुम्हाला माझीच गरज का आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की या विषयासाठी त्यांना फक्त मीच हवा होतो”. (Chhaava Movie Music)
================================
हे देखील वाचा : ‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!
================================
रेहमान पुढे असं देखील म्हणाले की, “प्रेक्षक चित्रपट पाहून आंधळेपणाने प्रभावित होत नाहीत. मला वाटतं या चित्रपटात खूप काही आहे आणि त्याचा शेवट पाहण्यासारखा आहे. लोक यापेक्षा खूप अधिक समजूतदार आहेत. तुम्हाला वाटतं का की लोकं फक्त चित्रपट पाहून प्रभावित होतील. ‘छावा’ हे सर्वात जास्त पूजनीय पात्रांपैकी एक आहे. ते प्रत्येक मराठी माणसाच्या रक्ताप्रमाणे आहे. ‘छावा’ चित्रपट हा राजांची शौर्यता दाखवणारा आहे आणि त्यामुळे मला या चित्रपटाला संगीत देण्याचं भाग्य मिळालं, याचा मला अभिमान आहे”, असं उत्तर रेहमान यांनी स्पष्टपणे दिलं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi