दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
A Thursday: नाजूक यामी गौतमचा सणकी लूक, ट्रेलर पाहून काळजाचा ठोका चुकला
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमच्या ‘A Thursday’ या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला. दोन तासात या ट्रेलरला एक मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. याचा ट्रेलर पाहून आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. यामी गौतमच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
रॉनी स्क्रूवाला निर्मित हा चित्रपट १७ फेब्रुवारीला डिझ्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यामीसोबतच डिंपल कपाडिया, नेहा धूपिया, अतुल कुलकर्णी, माया सराओ आणि करणवीर शर्मा हे कालाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
ट्रेलरची सुरुवात एका फोन कॉलने होते. यामध्ये यामी गौतम कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये फोन करते आणि सांगते की, ती ज्या शाळेत शिकवते तिथल्या १६ विद्यार्थांना डांबून ठेवले आहे. त्यानंतर यामी पोलिसांना तिच्या मागण्या सांगते. मग तेव्हाच या सीनमध्ये नेहा धुपियाची एंट्री होते, नेहा एक पोलीस अधिकारी असते.
या ट्रेलरमध्ये यामी गौतम एका वेगळ्याच रूपात दिसली आहे. छोट्याशा ट्रेलरमध्येही तिच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळत आहे. “पोलिसांनी जर मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दर तासाला एका मुलाला मारले जाईल”, हे फोनवर बोलताना यामी ज्या पद्धतीने म्हणते, ते पाहून अंगावर काटा येतो. यामी गौतमने पंतप्रधानांशी बोलण्याची मागणी हा या चित्रपटातला ट्विस्ट असणार आहे.
या चित्रपटात डिंपल कपाडिया पंतप्रधानांच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये यामी चक्क पंतप्रधानांना धमकी देताना दिसतेय. “जर पंतप्रधान माझ्याशी बोलले नाहीत, तर मी एका मुलाला ठार मारीन आणि त्यासाठी जबाबदार पंतप्रधान असतील”, हे ती ज्या पद्धतीने सांगते ते पाहून काळजाचा ठोका चुकतो. यामी गौतमचा खुनशी चेहरा पाहून चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
शिक्षिका नयना जैस्वाल म्हणजेच यामी गौतम अचानक तिच्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवते तेव्हा एका लहान मुलांच्या हसण्याने आणि निरागसतेने कथा सुरू होते. नयनाने एवढे कठोर पाऊल का उचलले? त्याचा उद्देश काय आहे? या अनेक प्रश्नांची उत्तरे चित्रपटामध्ये मिळतीलच. चित्रपटाची कथा वेगवेगळे ‘ट्विस्ट आणि टर्न्स’ घेत मानवी स्वभावाची काळी बाजू उलगडून दाखवते.
यामी गौतम ‘A Thursday’ या चित्रपटात एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. नयनाची भूमिका साकारणारी यामी गौतम म्हणाली, “मी कधीही नयनासारखी वेगळी भूमिका साकारलेली नाही.” तिने या पूर्वी खूप वेगवेगळ्या भूमिका असलेले चित्रपट केले आहेत. तिला त्या वेगवेगळ्या भूमिका करताना अनेक वेगवेगळे अनुभव आले, परंतु तिने तिची प्रत्येक भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे.
====
हे देखील वाचा: Badhaai Do Movie Review: ‘त्यांच्या’ प्रश्नांना ‘वाचा’ फोडणारा!
=====
पोलीसाची भूमिका साकारणारी कॅथरीन अल्वारेझ या भूमिकेविषयी बोलताना नेहा धूपिया सांगते, “जेव्हा मी पहिल्यांदा ही स्क्रिप्ट वाचली, तेव्हाच मी हा चित्रपट करायचं ठरवलं. यामध्ये गर्भवती पोलिस अधिकारी साकारत आहे. माझी भूमिका अत्यंत आव्हानात्मक आहे. कारण मी मुलांशी संबंधित उद्भवलेल्या एका बिकट परिस्थितीला सामोरी जात आहे. कॅथरीन (माझे पात्र) देखील लवकरच आई होणार आहे. त्यामुळे या मुलांच्या पालकांच्या भावना मी समजू शकते.
चित्रपटाचा वेग प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवेल. संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे आणि एक थ्रिलर चित्रपट बनवला आहे जो सर्वांचे मनोरंजन करेल.
====
हे देखील वाचा: बोल्ड अँन्ड ब्युटीफूल डिंपल तेवढीच खंबीर स्त्री म्हणून जगली…
====
याआधी यामी गौतम ‘भूत पुलिस’, ‘उरीः द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटांमध्ये दिसली होती. या दोन्ही चित्रपटातील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले. परंतु ‘A Thursday’ चित्रपटातील यामीचा हा ‘फर्स्ट लूक’ पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.