दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शीना बोरा खून प्रकरणावर वेबसिरीज बनवली जाणार
मुंबईच्या हायक्लास सोसायटीमधील इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी शीना 24 एप्रिल 2012 पासून बेपत्ता होती. अर्थात इंद्राणीनं तिची ओळख मुलगी म्हणून नाही तर बहिण म्हणून करुन दिली होती. इंद्राणी मुखर्जी हे चर्चेतील नाव… तिच्या मुलीच्या शोधासाठी सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पण या शोधाची मालिका संपली आणि एकामागून एक धक्के बसू लागले. यात शिनाची हत्या (Sheena Bora) झाल्याचे उघड झाले. या हत्येसाठी तिची सख्खी आई इंद्राणी मुखर्जी हिला अटक करण्यात आले. नंतर तिच्या सावत्र वडीलांना अटक झाली. अत्यंत हायप्रोफाईल अशा या हत्याकांडानं सर्वत्र एकच खळबळ उडाली. शीनाचं तिच्या सावत्र भावावर प्रेम जडल्याची चर्चा झाली. म्हणूनच आईनं आपल्या लेकीला संपवल्याच्या बातम्या येऊ लागल्या. एकेकाळी मिडीया हाऊस चालवणारी इंद्राणी जेलमध्ये पडली… कधी शिना (Sheena Bora) जिवंत असल्याची बातमी परसली. एकूण या शिना बोरा हत्याकांडातील गुंता काही अजून सुटला नाही. एका रहस्यकथेसारखी ही सत्यघटना अधिक गुंतागुंतीची होत गेली आहे. याच सत्यघटनेवर शोधपत्रकार आणि लेखक संजय सिंग हे पुस्तक लिहित आहेत. विशेष म्हणजे हे पुस्तक पूर्ण व्हायच्या आतच या पुस्तकातील कथेवर वेबसिरीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिना बोरा (Sheena Bora) हत्याकांडातील अजूनही काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. या वेबसिरीजच्या माध्यमातून अशाच अनुत्तरीत प्रश्नांना प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.
देशातील सर्वात थरारक मर्डर मिस्ट्रीपैकी एक असलेल्या शीना बोरा (Sheena Bora) खून प्रकरणावर एक वेबसिरीजही बनवली जाणार आहे. सध्या वेबसिरीजमध्ये हत्येचे रहस्य, खळबळजनक घटना, मोठे अपघात आणि ऐतिहासिक घटना आदींचा ट्रेंड आहे. देशातील अनेक गाजलेल्या गुन्हेगारी घटनांवर भव्य वेबसिरीज आल्या आहेत. आता या वेबसिरीजमध्ये शिना बोरा (Sheena Bora) हत्याकांडाची भर पडणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील खळबळजनक शीना बोरा हत्याकांडावर एक वेबसिरीजही बनवली जाणार आहे. ही वेब सिरीज पत्रकार संजय सिंह यांच्या ‘एक थी शीना बोरा’ या पुस्तकावर आधारित असेल.
2015 साली झालेल्या शीना बोरा (Sheena Bora) हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. हे हत्याकांड एवढे गाजले की, संपूर्ण देश एका कुटुंबाच्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांच्या जाळ्यातच अडकून गेला होता. पोलिस केसनुसार, शिनाची आई इंद्राणीने तिचा दुसरा घटस्फोटित पती संजीव खन्ना आणि तिच्या ड्रायव्हरच्या मदतीने शिनाची हत्या केली. शिना ही इंद्राणीला तिचा पहिला पती, सिद्धार्थ दास पासून झालेली मुलगी. यात अजून गुंतागुंत म्हणजे, इंद्राणीनं तिसरं लग्न केलेलं. तिचा तिसरा नवरा म्हणजे उद्योपती, पीटर मुखर्जी.
इंद्राणीनं हत्या का केली, याचा उल्लेख पोलीस केसमध्ये झाला आहे, त्यानुसार शीना बोरा इंद्राणीचा तिसरा पती, उद्योगपती पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुलसोबत लग्न करणार होती, आणि इंद्राणीला हे मान्य नव्हते. अत्यंत गुंतागुतीच्या या नातेसंबंधावर अनेक दिवस टिव्हीवरील बातम्यांमध्ये आणि टॉकशोमध्ये चर्चा चालू होती. वृत्तपत्रांचे कॉलमच्या कॉलम भरून इंद्राणी आणि तिच्या नातेसंबंधावर लेख येत होते. यातूनच संजय सिंह यांनी पुस्तक लिहायला घेतलं. लेखक संजय सिंह म्हणतात, हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. या प्रकरणात आजोबांना त्यांच्या नातवाचे पालक म्हणून जगावे लागले. खऱ्या आईला, समाजात आई न म्हणता मोठी बहीण म्हणून हाक मारावी लागली. या एका वास्तवात घडलेल्या घटनेत एका चित्रपटासारखा मसाला भरला होता. हायक्लासच्या मागील काळापडदा, मीडियाचा मुकाबला, राजकारण, पोलीस खात्यातील अंतर्गत भांडणे, राष्ट्रीय पातळीवरील भ्रष्टाचार, नातेसंबंधांचे जाळे आदी सर्वांचा या शिना बोरा(Sheena Bora) हत्याकांडामध्ये समावेश होता. त्यामुळेच यावर पुस्तक लिहिवेसे वाटले, आणि याच पुस्तकावर आता वेबसिरीजही येत असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. अर्थातच क्वचितच असे घडते की, पुस्तकाचे ओटीटी हक्क आधी विकले जातात आणि पुस्तक नंतर छापले जाते. ‘एक थी शीना बोरा’ या पुस्तकाचेही तेच झाले आहे.
======
हे देखील वाचा : साऊथची शिस्त, मुंबईत बिघडते…
======
लेखक संजय सिंग हे एक प्रसिद्ध शोध पत्रकार आहेत. त्यांनी देशातील प्रतिष्ठित माध्यम संस्थांमध्ये काम केले आहे. हजारो कोटी रुपयांच्या तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचे श्रेयही त्यांना जाते. तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यावरील त्यांच्या पुस्तकावर आधारित ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ नावाची वेब-सिरीज तयार केली आहे.