Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी

Aabhalmaya : शिवाजी पार्कमुळे ‘सुधाच्या आयुष्यात तो ट्विस्टट आला नाही!
मालिकाविश्वातील पहिली सुपरहिट आणि प्रेक्षकांना अगदी आपल्याच घरातील गोष्ट टी.व्हीवर दाखवत आहेत असा भास देणारी मालिका म्हणजे ‘आभाळमाया’ (Aabhalmaya). झी मराठी (Zee Marathi) (पूर्वीचं अल्फा टीव्ही) या चॅनेलवर १९९९ साली प्रदर्शित झालेली ही मालिका एका खाजगी चँनेलवरची पहिली आणि मराठी मालिकाविश्वातली दामिनी नंतरची दुसरी ‘डेली सोप’ होती. आत्ताच्या मालिकांप्रमाणे जास्त मेलॉड्रामा किंवा खलनायकांची अतिशयोक्ती असं काहीही न दाखवता साधी सोप्पी कुटुंबाची कथा आभाळमाया मालिकेतून दाखवण्यात आली होती. शिवाय विनय आपटे (Vinay Apte) सारख्या अष्टपैलू लेखक आणि दिग्दर्शकामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. पण तुम्हाला माहित आहे का? या मालिकेत शरदप्रमाणे सुधाच्याही आयुष्यात एक पुरुष येतो असा कथेचा ट्रॅक बदलण्यात आला होता… नेमकं काय घडलं होतं.. वाचा…(Aabhalmaya serial twist)

आभाळमायाचं कथानक….
तर, ’आभाळमाया’ (Aabhalmaya) मालिकेच्या कथेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, शरद (मनोज जोशी), सुधा आणि जय (संजय मोने) कॉलेजपासूनचे मित्र. जयचं सुधावर मनापासून प्रेम असतं. परंतु जेव्हा तिचं शरदवर प्रेम आहे हे कळतं तेव्हा तो आनंदाने तिचा मित्र बनून राहतो आणि नेहमी तिला साथ देतो. सुधा (सुकन्या कुलकर्णी-मोने) हुशार आहे, करिअर ओरिएंटेड आहे. एका कॉलेजमध्ये प्राध्यापिकेची नोकरी करते. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तिने प्रमोशनही मिळवते आणि आपल्या संसाराची गाडी देखील ती सुरळीत चालवत असते. नोकरीमध्ये येणाऱ्या समस्यांचा, आव्हानांचा सामना करताना ती वैयक्तिक आयुष्यातल्या दुःखांशीही लढत असते. आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळल्यावर ती त्याला घरातून निघून जायला सांगते, पण त्याचवेळी या संबंधातून झालेल्या त्याच्या मुलीला ती स्वीकारते. तिचा दुस्वास न करता तिला आईचं प्रेम देते. जे घडलं त्यामध्ये तिचा काहीच दोष नाही, हा सुज्ञ विचार ती करून तिची जबाबदारीही घेते. (Entertainment news)
===========================
हे देखील वाचा: रसिकांची आभाळमाया
===========================
९० च्या दशकात चित्रपटांइतकंच प्रेक्षकांनी मालिकांना आपलंसं केलं… अगदी तरुण मुलांना घरी बसून आवर्जून मालिका पाहण्याची आवड होती… मालिका इतक्या दर्जेदार होत्या की आजही २५-३० वर्षांनी पुन्हा तशा किंवा त्याच मालिका प्रसारित व्हाव्या अशी इच्छा प्रेक्षक बोलून दाखवतात… शिवाय मासिकांचे शीर्षकगीतेही प्रचंड गाजली होती… ‘आभाळमाया’ (Aabhalmaya) मालिका ही त्याच पठडीतील. या मालिकेत शरदच्या जीवनात जशी दुसरी स्त्री येते तसंच काहीसं सुधाच्याही आयुष्यात पुरुष येतो असं दाखवण्याची कल्पना सुचली होती. याबद्दल अभिनेत्री मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole) हिने ‘द क्राफ्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक किस्सा सांगितला होता. (Marathi daily soaps)

मुग्धा म्हणाली, ‘आभाळामायाची (Aabhalmaya) कथा ही रतनबाई कॉलेजमधील प्राध्यापक सुधा जोशी या शिक्षिकेभोवती फिरते, ज्यांच्या कुटुंबात तिचा पती शरद जो एक प्राध्यापक देखील आहे आणि त्यांना दोन मुली आकांशा आणि अनुष्का आहेत. शरद जेव्हा दुसऱ्या प्रोफेसर चित्राच्या प्रेमात पडतो जिची चिंगी नावाची एक मुलगी आहे, तेव्हा कुटुंबात तेढ निर्माण होते. पण त्यावेळी मालिकेत सुधा जोशी यांच्या आयुष्यात देखील एक पुरुष आणावा अशी कल्पना निर्मात्यांना सुचली होती.(Untold stories)

पुढे मुग्धा म्हणाली,”महत्वाचं म्हणजे असा कथेचा प्लॉट विचार करुन अभिनेते सचिन खेडेकर यांना तो रोल ऑफर केला होता आणि त्यांनी येऊन २ सीन्स केले होते. पुढे काही झालं नाही कारण, मेकर्सना अशी शंका आली की, शिवाजी पार्कला फिरताना जे प्रेक्षक भेटतील त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया आली की जी आपण एक आदर्श व्यक्तिरेखा म्हणून दाखवतो आहोत त्या स्त्रीच्या आयुष्यात दुसरा पुरुष आलेला आवडणार नाही. २०२३ साली जेव्हा आपण अरुंधतीचं लग्न करतो तेव्हाही सोशल मिडीयावर याच कमेंट्स येतात. की तुम्ही आई म्हणून जी व्यक्तिरेखा दाखवली आहे तिचं दुसरं लग्न कसं दाखवू शकता. यावरुन एक कळतं की २३-२४ वर्षांनी प्रेक्षकांकडून काही वेगळी कमेंट आलीच नाही”. (Aabhalmaya serial)
===========================
हे देखील वाचा: आभाळमाया – मराठी मालिकांच्या इतिहासातील एक सोनेरी पान
===========================
दरम्यान, अल्फा म्हणजे आत्ताचं झी मराठी किंवा ई.टीव्ही मराठी या चॅनल्सवर प्रसारित झालेल्या मालिकांमधून आत्ताच्या चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार घडले. १९९९ साली सुरु झालेली ‘आभाळमाया’(Abhalmaya) मालिका २००३ पर्यंत यशस्वीपणे सुरु होती. या मालिकेमधून श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), ऋजुता देशमुख, अविष्कार, राहुल मेहंदळे, Umesh Kamat, सुबोध भावे, संज्योत हर्डीकर, मनवा नाईक (Manva Naik) अशा नवीन कलाकारांना दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. तर या मालिकेमध्ये ‘चिंगी’ची भूमिका साकारणारी स्वरांगी मराठे ही बालकलाकार प्रचंड लोकप्रिय झाली होती. आणि वर उल्लेख केलेले प्रत्येक कलाकार आज मराठीच नव्हे तर हिंदी कलाविश्व देखील आपल्या अभिनयाने गाजवत आहेत.(Marathi daily soap nostalagia)
रसिका शिंदे-पॉल