Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश

…जेव्हा नीतू कपूर यांनी Rishi Kapoor यांच्या अफेअर्सना One Night

Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत

डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला होणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नाते कलाकारांचे; किस्से त्यांचे!!

 नाते कलाकारांचे; किस्से त्यांचे!!
कलाकृती तडका फूल खिले गुलशन गुलशन

नाते कलाकारांचे; किस्से त्यांचे!!

by Kalakruti Bureau 04/04/2020

परवा सामान आणायला दुकानात गेले असताना ,एक काकू सतत माझ्याकडे बघत होत्या, गालातल्या गालात हसत होत्या ,त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचय हे माझ्या लक्षात आलं होतं.. राहून राहून शेवटी त्यांनी मला बिल काऊंटरपाशी गाठलं आणि विचारलं  ,” ए तू चिंगी ना ?” मी दोन सेकंद माझ्या कडेवर बसलेल्या “माझ्या” चिंगी (उर्फ माझ्या लेकी) कडे बघितलं आणि हसू न आवरता त्यांना म्हटलं, ” हो मीच चिंगी” माझं मन भरकन वीस वर्षे मागे गेलं…

    रोज रात्री अल्फा ( तेव्हा झी मराठी नव्हतं) टीव्हीवर पहिलं म्युझिक वाजलं आणि देवकी ताईंच्या आवाजातील जडतो तो जीव सुरू झालं की तमाम लोक काम सोडून आभाळमाया बघायला बसायचे. प्रेक्षकांमध्ये आभाळमायाविषयी इतकं कुतूहल असण्याचं कारण, ती पहिली “डेली सोप” होती .त्यातून विनय आपटे, मंदार देवस्थळी यांच्यासारखे दिग्दर्शक आणि सुकन्या मोने ,मनोज जोशी, संजय मोने, शुभांगी जोशी, अशोक समेळ, अंकुश चौधरी असे अनेक कसलेले कलाकार!

माझ्या घरी पहिला फोन आला तो माझ एका सीरियल मधलं काम पाहून! तुमच्या मुलीला भेटायला घेऊन याल का? मी तेव्हा सहा-सात वर्षांची असेन.आई बाबांचा हात धरून गेले. समोर विनय आपटे बसलेत, ते खूप मोठे कलाकार आहेत, याचं सोयरसुतकही नव्हतं मला! चिंगी हे पात्र अगदी थोड्या एपिसोड साठी असेल असं सांगण्यात आलं ..आभाळमायासारख्या मालिकेला नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं .

आई बाबांनी विचारलं,  ‘करशील ना गं’ ? मला आधी काम केल्यामुळे कॅमेरा काय असतो, निदान आपल्याला वाक्य पाठ करून बोलायची आहेत इतकं तरी माहित होतं.

    शूटिंग सुरू झालं शूटिंग ला आईबरोबर जायचं, तिथे आई पाठ करून घेणार आणि मी ते बोलणार ! आभाळमाया च्या सेटवर पहिल्यांदा इतकं  लहान कोणीतरी पहिल्यांदाच आलं असल्यामुळे सगळे कौतुकाने, प्रेमाने आणि महत्त्वाचं खूप “सांभाळून घेऊन” काम करायचे. चिंगी हे पात्र प्रेक्षकांना इतका आवडलं की ते पुढे खूप वाढवण्यात आलं

आभाळमाया ने मला काय दिलं ,तर नक्कीच आभाळा एवढी माया! मग ती मला आईच्या रुपी भेटलेली सुकन्या ताई असो , आजी रुपी भेटलेली अक्का आजी असो किंवा माझ्या तायांच्या रूपात भेटलेल्या आकांक्षा अनुष्का  (संज्योत , मनवा ताई ) असोत !

प्रेक्षकांची माया तर उदंड बरसत होती आणि अजूनही बरसतेच आहे.अनेक  समारंभांना चीफ गेस्ट म्हणून बोलवायचे, ट्रेनमध्ये तर चक्क डायरेक्ट खिडकीतली जागा मिळायची , बालकलाकार म्हणून पुरस्कार दिले जायचे !

या सगळ्यामध्ये चिंगी चे हात आभाळाला जरी लागत असले तरी त्याचे दोर तिच्या आई-वडिलांच्या हातातच होते .या सगळ्यात माझा अभ्यास, खेळ आणि सगळ्यात महत्वाचं माझं बालमन त्यांनी कधीही हरवू दिलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कधीही डोक्यात हवा जाऊ दिली नाही.

 शेवटी एवढंच म्हणेन,

 घननीळा डोह  पोटी गूढ माया आभाळमाया .. आभाळमाया…..

-स्वरांगी मराठे

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Daily Soaps Entertainment Featured movies serial Top Films zee marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.