
Aambat Shaukin :’आंबट शौकीन’ चित्रपटात पूजा, प्रार्थना दिसणार महत्वाच्या भूमिकेत
आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हे हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटात पूजा सावंत, प्रार्थना बेहरे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वैयक्तिक जीवनात पूजा (Pooja Sawant) आणि प्रार्थना (Prarthana Behre) एकमेकांच्या सख्ख्या मैत्रिणी असून पहिल्यांदाच त्या स्क्रिन शेअर करणार आहेत. (Ambat Shaukin marathi movie)

चित्रपटाच्या नावावरून कथानकाचा अंदाज बांधता येत असला तरी अनेक घडामोडींतून चित्रपटाची मनोरंजक कथा उलगडत जाते. तीन मित्रांच्या भोवती चित्रपटाची रंजक गोष्ट गुंफण्यात आली आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पाहावी अशी प्रत्येक पिढीची रंजक गोष्ट यातून आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘आंबट शौकीन’ चित्रपट पाहण्यासाठी १३ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (Marathi upcoming movie)
===========================
हे देखील वाचा: Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!
===========================
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. अभिनेत्री पूजा सावंत, प्रार्थना बेहरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, गौतमी पाटील, मोनालिसा बागल, अमेय वाघ, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, देवेंद्र गाडकवाड, रमेश परदेशी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. (Entertainment update news)