Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Abhijeet Panse: “मी आणि अश्विनी परस्पर संमतीने…’, लग्नाच्या २७ वर्षांनी पानसेंची ‘मोठी’ घोषणा
कलाविश्वात कधी कोणता ट्रेंड सुरू होईल याचा काही नेम नाही… आतापर्यंत बॉलिवूड कलाकार त्यांच्या घटस्फोट किंवा ब्रेकअपबद्दल जाहीरपणे सोशल मीडियावर व्यक्त होत होते… आता हा ट्रेंड मराठी कलाकारांनी देखील आत्मसात केलेला दिसत आहे…. काही दिवसांपूर्वी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) याने सोशल मीडियावरून बायकोसोबत विभक्त झाला असल्याचं जाहीर केलं होतं… आणि आता दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते अभिजित पानसे (Abhijeet Panse) यांनी देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठा निर्णय जगजाहीर केला आहे… सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी २७ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम लागला असून त्यांनी आपल्या पत्नीसोबत संमतीने घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे…

अभिजित पानसे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “तुम्ही प्रत्येकाने तुमच्या वेगळ्या मार्गानं माझ्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच मला माझ्या आयुष्यातला एक वैयक्तिक आणि महत्त्वाचा अपडेट तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तुमच्यापैकी काहींना मी ही बातमी आधीच सांगितली आहे.”(Entertainment News)
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “२७ वर्षांच्या संसारानंतर आणि असंख्य सुंदर आठवणींनंतर, अश्विनी आणि मी एकत्र राहण्याचा आणि आमचं आयुष्य पुढं नेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमचं कायदेशीर लग्न फेब्रुवारी १९९८ मध्ये परस्पर संमतीने संपन्न झालं. ही बदलाची वेळ नीट समजून घेण्यासाठी आणि खासगीपणे स्वीकारण्यासाठी मी थोडा वेळ घेतला. विशेषत: आमच्या मुलींच्या हिताचा विचार करून सर्व काही नीट पार पडावं, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. त्या माझं पहिलं प्राधान्य आहेत आणि मी अश्विनीसोबत मिळून त्यांचं संगोपन, आधार आणि स्थैर्य कायम ठेवण्याचं वचन देतो. आमच्यासाठी हा एक नवा अध्याय आहे, पण पालक म्हणून आमचं नातं आणि एकमेकांबद्दलचा आदर नेहमीच कायम राहील. या काळात आमच्या गोपनीयतेचा आणि निर्णयाचा आदर कराल, याबद्दल मी मनापासून आभारी आहे.” (Marathi celebrity gossips)
====================================
हे देखील वाचा : Rahul Deshpande : लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल पत्नीपासून झाले विभक्त
====================================
दरम्यान, पोस्टच्या शेवटी पानसे यांनी लिहिलं आहे की, “हल्ली सगळंच सोशल मीडियावर शेअर करण्याची पद्धत आहे, म्हणून मीही”. राहुल देशपांडे नंतर संगीत देवबाभळी नाटकातील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने देखील ५ वर्षांच्या संसारातून वेगळं होण्याचा घेतलेला निर्णय लोकांपर्यंत पोहोचवला होता…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi