‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आकाश येतोय… सैनिकाच्या रुपात… आपल्या सगळ्यांना भेटायला…
सैराट चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेल्या नवख्या आकाश ठोसर (Akash Thosar) ला नंतर मात्र अपेक्षित असं यश मिळालं नाही. मात्र आता एका वेब सिरीजमध्ये आकाशचा बदललेला लुक आणि त्याचा अभिनय याची चांगलीच चर्चा आहे. डिजनी प्लस हॉटस्टारवर 26 फेब्रुवारी रोजी रिलीज होणा-या 1962-द वॉर इन द हिल्स (1962: The War in the Hills) या वेब सिरीज मध्ये आकाश ठोसर एका सैनिकाच्या भूमिकेत आहे. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सिरीजमध्ये आकाश ठोसरचा मेकओव्हर बघता येईल. एका सैनिकाच्या रुपातला आकाश खूप वेगळा दिसतोय. त्यासोबत त्याच्या अभिनयाचीही चर्चा आहे.
हे देखील वाचा: ‘द टाईमलाईनर्स’ची ‘कॉलेज रोमान्स’ आलीय नवा सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला..
भारत चीन युद्धावर आधारीत या वेबसिरीजमध्ये अभय देओल (Abhay Deol) आणि सुमीत व्यास (Sumeet Vyas) प्रमुख भूमिकेत आहेत. तीन हजार चिनी सैनिकांना 125 भारतीय जवानांनी दिलेले चोख उत्तर यावर ही वेब सिरीज आधारीत आहे. यात आकाश, किशन नावाच्या भारतीय जवानाची भूमिका करत आहे. मेजर सूरज सिंह यांच्या बटालियनमध्ये हा किशन आहे.
इथे मेजरच्या भूमिकेत अभय देओल आहे. या भूमिकेवर आकाश बेहद खुश आहे. त्याच्यासाठी हा ड्रीमरोल आहे. लहानपणापासून भारतीय सैन्य आणि पोलीस यांच्याबद्दल आपल्याला आकर्षण होते. आता एका जवानाची भूमिका करायला मिळाल्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला आहे. भूमिकेनिमित्त तरी वर्दी घालायला मिळाली याचा आपल्याला अभिमान असल्याचं आकाशनं सांगितलं.
2016 मध्ये नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या सैराटमधून आकाश हा चॉकलेट हिरो म्हणून समोर आला. मात्र 1962 द वॉर इन द हिल्स या वेब सिरीजसाठी आकाशनं आपला पूर्ण मेकओवर केला आहे. भारत आणि चीनच्या सिमेवरील गॅल्वान व्हॅलीतील संघर्ष या वेब सिरीजमध्ये आहे. सैनिकाची भूमिका साकारण्यासाठी आकाशनं भरपूर मेहनत घेतली आहे.
26 फेब्रुवारीला रिलीज होणा-या या वेबसिरीजमधून आकाशचा लूक त्याच्या चाहत्यांना नक्की आवडेल असाच आहे.