
मुलगी झाली हो! अभिनेता Akshay Waghmare आणि योगिता गवळी यांना दुसऱ्यांदा कन्यारत्न…
मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे (Actor Akshay Waghmare) आणि त्याची पत्नी योगिता गवळी (Yogita Gawli) यांनी त्यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचं स्वागत केलं आहे. योगिताने आपल्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. २०२१ मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या लेकीचं स्वागत केलं होतं. आता त्यांचं कुटुंब पूर्णपणे चौकोनी झालं असून, त्यांचा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे.(Actor Akshay Waghmare)

अक्षय वाघमारे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक गोड पोस्ट शेअर करत हा आनंद चाहत्यांसोबत व्यक्त केला आहे. “सीझन २ रिलीज्ड. पोरगी झाली रे…” अशी गोड बातमी त्यांनी पोस्ट केली. अक्षयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अक्षय व योगिता हे दोघंही सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बस स्टॉप’, ‘दोस्तीगिरी’, ‘बेधडक‘ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दुसरीकडे, योगिता गवळी ही महिलांच्या आरोग्याविषयी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेसाठी काम करते.

योगिता गवळी ही कुख्यात गँगस्टर अरुण गवळी (Gangster Arun Gawali ) यांची मुलगी आहे. अरुण गवळी, जो “डॅडी” म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचे नाव महाराष्ट्रात आणि मुंबईत सर्वत्र ओळखले जाते. योगिता आणि अक्षय वाघमारे यांनी २०२० मध्ये ८ मे रोजी विवाह केला. त्यांचं लग्न मुंबईतील दगडी चाळीत पार पडले होते. त्याचबरोबर, दोघांचा साखरपुडा डिसेंबर २०१९ मध्ये झाला होता.(Actor Akshay Waghmare)
============================
हे देखील वाचा: अखेर Isha Keskar चं ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका सोडण्याचं खरं कारण आलं समोर!
============================
आता योगिता गवळीने मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आपली उमेदवारी ही जाहीर केली आहे. भायखळ्याच्या प्रभाग क्र. २०७ मध्ये ती उमेदवार म्हणून रिंगणात उतरली आहे. योगिता गवळीने आपल्या सोशल मीडियावर याबद्दल घोषणा केली होती. “बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालं असून, मी भायखळ्याच्या प्रभाग क्र. २०७ मध्ये आपली उमेदवारी जाहीर करते,” असं तिने सांगितलं. योगिता गवळी या निवडणुकीत उतरत असताना, तिने आपल्या प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे . तिचं कार्य महिला आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय आहे. त्यामुळे तिच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळतोय. योगिता आणि अक्षय वाघमारे यांच्या यशस्वी कुटुंबीय जीवनासोबतच, ते सामाजिक क्षेत्रातही सक्रियपणे काम करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची लोकप्रियता आणि प्रभाव अधिक वाढला आहे.