‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेत होणार आस्ताद काळे ची एंट्री !
काही दिवसांपूर्वीच सोनी मराठी वाहिनीवर ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. तसेच निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार हीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर केलय. आणि अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहे. एसीपी अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना आहे. आणि तिच्या व्यक्तिरेखेचे नाव मोहिनी दुभाषी असे आहे.(Karan Gunhyala Mafi Nahi)
सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत. ते जाळं आहे ऑनलाईन गेमिंगचं. नकळत या जाळ्यात सगळे गुंतले जात आहेत. झटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात सगळे अडकत आहेत. त्यातून होणार्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्यांना आणखीन मोठ्या गुन्ह्यांच्या आहारी जावं लागतं आहे. यातून चोरी, सिरियल किलिंग या गुन्ह्याचे प्रमाणही वाढतं आहे. महाराष्ट्र पोलीस दलात त्यासाठीच ‘स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड’ नेमण्यात आलं आहे. त्याचा भाग इन्स्पेक्टर भोसले, जमदाडे आणि एसीपी अनुजा असणार आहेत. ते कशा प्रकारे या गुन्ह्याला आवरण्याचा आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करतील, हे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
आता ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेची एंट्री होणार असून या भूमिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेता पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करणार आहे. अभिनेता आस्ताद काळे ची या मालिकेत आता एंट्री होणार आहे. आस्ताद काळे हा अभिनेता नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो.’कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत आस्ताद एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुहास साटम असे या नेत्याचे नाव असून आता मालिकेत त्याच्या येण्याने कथानक काय वेगळे वळण घेणार? भोसले आणि जमदाडे यांच्या कामात काय भर पडणार का ? हे पाहण्याजोगे असणार आहे.
============================
===========================
‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेत कलाकारांची चांगली फळी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. त्यातच आता आस्ताद काळेच्या येण्याने मालिकेत एक वेगळी रंगत पाहायला मिळेल. एका पेक्षा एक वरचढ कलाकार एकाच वेळेला जेव्हा एकाच मालिकेतदिसतील, तेव्हा ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या थरारक मालिकेत जे वेगळेपण येईल ते पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर असेल.लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांचादेखील सोनी मराठी वाहिनीसाठी मालिकेसाठी चांगलाच हातभार लागला आहे.(Karan Gunhyala Mafi Nahi)
‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी मालिकाप्रेक्षकांना सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.