वाकांडाचा राजा गेला
ख-या आयुष्यातही बोसमन ख-या लढवय्यासारखाच जगला.चार वर्षापूर्वी त्याला आतड्याचा कर्करोग झाल्याचे समजले.तेही हा रोग तिस-या टप्प्यापर्यंत पोहचला होता, तेव्हा त्याचे निदान झाले.असे असले तरी बोसमन हरला नाही.
या चार वर्षात एकीकडे केमोथेरीपी, ऑपरेशन आणि औषधोपचारांचा मारा सहन करत बोसमनने आपल्या चाहत्यांना एकाहून एक सरस चित्रपटांची मेजवानी दिली. एवढंच काय आगामी काळात त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत. कर्करोगासारखा आजार शेवटच्या टप्प्यात गेला असतांनाही बोसमननं त्याचा गाजावाजा केला नाही.शेवटच्या श्वासापर्यंत तो त्याचे आवडते काम करत होता. अभिनय हा त्याचा श्वास होता. तो त्याने अखरेपर्यंत घेतला.
हॉलिवूडमध्ये दबदबा असलेल्या मार्व्हल युनिव्हर्समधला चॅडविक बोसमन हा पहिला कृष्णवर्णीय सुपरहिरो होता.त्याच्या ब्लॅक पॅंथरला ऑस्कर मिळाला. बोसमन ब्लॅंक पॅंथर बरोबर सिव्हील वॉर, इनफेनीटी वॉर, एन्ट गेम, फोर टू, गेट ऑन अप यासारख्या चित्रपटातही काम केलं आहे.सिव्हील वॉर दरम्यान त्याला कर्करोग असल्याचे स्पष्ट झालं होतं. एकीकडे या आजाराबरोबर ल़ढत बोसमननं या चित्रपटातील भूमिकांना योग्य न्याय दिला. लॉस एंजिसमधील घरात बोसमननं शेवटचा श्वास घेतला.आपला आवडता ब्लॅक पॅंथर वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी आपल्याला सोडून गेला,यावर त्याच्या चाहत्यांचा विश्वास नाही. त्याच्या चाहत्यांनी या बोसमनचा झुंझार योद्धा म्हणून गौरव केला आहे.
कर्करोगाचे उपचार सुरू असताना चॅडविक याने मार्शल, मा रेनीज ब्लॅक बॉटम या चित्रपटांमध्ये काम केलं.बोसमनचा जन्म अँडरसन, दक्षिण कॅरोलिना येथे झाला. तो स्वतःला नायजेरियातील योरूबा या जमातीचा वंशज मानायचा.चॅडविकचा लहानपणापासून अभिनयापेक्षा लेखनाकडे जास्त ओढा होता. हासस्कूलमध्ये असतांना तो नाटक लिहायचा.हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याने कला शाखेत पदवी घेतली.नंतर न्यूयॉर्क मधून डिजिटल फिल्म अकादमीची पदवी त्यानं संपादन केली.न्युयॉर्कमध्येच चॅडमिकनं काही काळ नाटक प्रशिक्षक म्हणून काम केलं. हॉलिवूडच्या चित्रपटात काम करण्याआधी त्याला काही टिव्ही मालिकांमध्ये काम मिळालं.
सुरुवातीला त्याला वर्णभेदाचा त्रास झाला.मात्र चॅडमिकचा अभिनय हा सर्व रंगात सरस ठरला.शिवाय अतिशय सौम्य, मनमिळावू स्वभाव हे चॅडमिकच्या यशाचं आणखी एक रहस्य होतं.त्यामुळे अल्पावधितच त्याच्याकडे मोठ्या बॅनरचे चित्रपट आले. मार्वलच्या ब्लॅंक पॅंथर या चित्रपटांनं बॉक्स ऑफीसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले.अफ्रिकेतील वाकांडा या देशावर आधारीत ही कथा…या वाकांडाच्या राजाचे अवघ्या जगभरात चाहते झाले.अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ब्लॅक पॅंथरची नोंद झाली.याच दरम्यान त्याची कर्करोगाबरोबर लढाई चालू होती.या सर्वातही त्यानं मार्शल, दा 5 ब्लड्स, मा रैनीचे ब्लॅक बॉटम आणि इतर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण केलं.
2019 मध्ये त्याने गायक टेलर सिमोन बरोबर लग्न केले. बोसमनच्या मृत्यूसमयी त्याची पत्नी सिमोन आणि त्याचे आईवडील त्याच्याजवळ होते.एका सच्चा योद्धयाला गमावल्याची खंत बोसमनच्या चाहत्यांना आहे.