Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

डॅनीने पहिलेच गीत गायले होते Lata Mangeshkar यांच्यासोबत!

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपट ग्लोबली हिट होण्यासाठी

Ranveer Singh सध्या करतोय तरी काय?

Aamir Khanला दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकची स्क्रिप्ट आवडली नाही?

Alka Kubal : ‘माहेरची साडी’ चित्रपट आधी ‘या’ हिंदीतील अभिनेत्रीला

“अखेर माझ्या आयुष्यात ‘ती’ आली; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने

‘काजळमाया’ या गूढ मालिकेतून अक्षय केळकरची स्टार प्रवाहवर एण्ट्री!

Sholay मधील सुरमा भोपाली ही भूमिका करायला जगदीप का तयार

Soha Ali Khan आणि सैफ अली खान एकत्र का राहात

Salman Khan & Aishwerya Rai : ….जेव्हा सलमान ऐश्वर्याच्या घरी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Indian Cinema : ‘या’ कलाकाराने पडद्यावर तब्बल ६१ वेळा नारद मुनीची भूमिका केली!

 Indian Cinema : ‘या’ कलाकाराने पडद्यावर तब्बल ६१ वेळा नारद मुनीची भूमिका केली!
बात पुरानी बडी सुहानी

Indian Cinema : ‘या’ कलाकाराने पडद्यावर तब्बल ६१ वेळा नारद मुनीची भूमिका केली!

by धनंजय कुलकर्णी 06/05/2025

एखाद्या कलाकाराने एकाच भूमिका कितीदा साकारावी? तब्बल ६१ वेळा. हो. अभिनेता जीवन (Actor Jeevan) यांनी त्यांच्या संपूर्ण सिने कारकिर्दीत ६१ वेळा पडद्यावर नारद मुनी यांची भूमिका साकारली. हा कदाचित विक्रम असावा. १९४८ साली भक्त ध्रुव या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा हि भूमिका केली.यात भक्त ध्रुव साकारला होता शशी कपूरने (Shashi Kapoor). त्या नंतर अनेक पौराणिक सिनेमातून ते नारद सकारात होते. त्यांनी नारद शेवटी साकारला होता राजश्री प्रोडक्शन च्या ‘गोपाल कृष्ण’ या सिनेमात १९७९ साली. यात कृष्णाची भूमिका सचिन पिळगावकरने (Sachin Pilgoankar) साकारली होती. जीवन जसे नारद म्हणून फेमस होते तसेच धूर्त कपटी, पाताळयंत्री खलनायक म्हणून देखील. (Bollywood tadaka)

हिंदी सिनेमाच्या खलनायकाच्या यादीत प्राणने नि:संशयपणे पहिला क्रमांक पटकावला असला तरी दुसर्‍या क्रमांकाचे दावेदार अनेक आहेत त्यातील एक होता जीवन! सिनेमाच्या सुवर्ण युगात घेतलेला त्याने खलनायकाच्या व्यक्तीरेखेचा वसा अमिताभ युगापर्यंत चालविला.त्याचा कावेबाज चेहरा, कुर्रेबाजपणे चष्म्याच्या कोनातून बघणं,चेहर्‍यावरचं कुत्सित हास्य,एक हातात रिव्हाल्वर तर दुसर्‍या हातात मदनिका,उंची पाश्चात्य पेहराव असा त्याचा अटायर असायचा.डोक्यात सतत कुटील कारस्थानं चालू असावी अशी बेरकी नजर प्रेक्षकांच्या छातीत देखील धडकी भरायची.आजच्या पिढीला त्याचे अमिताभ सोबतचे रोल आठवत असतील. (Bollywood)

मनमोहन देसाईंच्या ’अमर अकबर अ‍ॅंथोनी’त तो प्राणला आपल्या बूटावर दारू ओतून ते बूट पुसायला लावतो त्या वेळचा त्याचा गुर्मीतला संवाद ’ जूते ऐसे चमकाऒ की सूरत नजर आनी चाहीए’.प्रेक्षकांना चीड आणायला लावायची ताकत त्याच्या अभिनयात होती.’जॉनी मेरा नाम’ मधील त्याने रंगवलेला ’हिरा’ हा स्मगलर आणि ’काम तो हो गया लेकीन हिरा पकडा गया’.या त्याच्या उच्चरातून डोकावणारा पाश्चात्य टोन त्याच्या स्मगलरच्या अदाकारीला साजेसा होता. (Entertainment)

=============

हे देखील वाचा : Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य सिनेमा!

=============

पृथ्वीवरील नंदनवनात म्हणजेच कश्मीरमध्ये जीवनचा जन्म २४ ऑक्टोबर १९१५ रोजी एका भल्या मोठ्या कुटुंबात झाला.त्याला सख्खे सावत्र मिळून २४ भावंड होती.लहान वयातच तो पोरका झाला.लाहोरला शालेय शिक्षण घेतल्यावर वयाच्या १८ व्या वर्षी खिशात २६ रूपये घेवून तो मुंबईत सिनेमाची स्वप्ने घेवून आला.पण इथे संघर्ष करावा लागला.मोहन सिन्हा यांच्या स्टुडिओत ते ’रिप्लेक्टर बॉय’म्हणून रूजू झाले.त्यांच्या सोबत व्दारका दिवेचा होते.एक दिवस सिन्हांनी जीवनला पाहिले. गोरा गोमटा उंचपुरा तरूण जीवन त्यांना नायक म्हणून मनोमन आवडला आणि त्याला ताबडतोब ’फॅशनेबल इंडीया’ या सिनेमाचा नायक बनवून टाकले.त्याचे खरे नाव होते ओंकारप्रसाद दार! पण एवढे लांबलचक नाव नको म्हणून सुटसुटीत ’जीवन’करून टाकले. (Bollywood tadaka)

नायक बनण्याचा आपला चेहरा नाही हे त्याने लवकर ओळखले व त्याने खलनायकीकडे मोर्चा वळविला.पन्नासच्या दशकातील गाजलेल्या ‘नागीन’,’दुर्गेश नंदीनी’,’हलचल’,’तराना’,’फागुन’ या सिनेमातून त्याने खलत्वाचे रंग भरले. दिलीप-राज-देव या त्रिकूटासोबत हो गाजला.दिलीप सोबत ’नया दौर’ मधील त्याची भूमिका खूप गाजली. देव सोबत ‘नौ दो ग्यारह’, ‘जॉनी मेरा नाम’ या सिनेमातील जीवनची ऐटबाज भूमिका भाव खाऊन गेली.’आधी रात’सिनेमात नर्गीसच्या क्रूर दारूड्या नवर्‍याची भूमिका काय अफलातून केली होती.सत्तरच्या दशकात व्हीलन अधिक स्टायलीश बनला.धूर्त ,कावेबाज,कपटी व्यक्ती हा तर त्याच हातखंडा होता.अमिताभ सोबत याराना,लावारीस,सुहाग,देश प्रेमी या सिनेमात तो होता. (Entertainment update news)

=============

हे देखील वाचा : Madhumati : मधील हे गाणे बिमल रॉय यांनी का अर्धवट चित्रित केले?

=============

आपल्या खास स्वरात लांबलचक वाक्ये उच्चरण्याची त्याची अदा ग्रेट होती.’प्राण जाये पर वचन न जाये’ या सिनेमात तो म्हणतो ’हां हाम ठकूर साब दिल के मामले बडे नाजूक होते हैं. गोला बारूद से भी भडक उठते है और फिर लोग तो यही कहेंगे की जब ठाकूर कि चोरी पकडी गयी तो अपनी दिल की प्यास बुझाकर गरीब मुनीया का घर हि उजाड दिया.’ या वेळचा त्याचा अभिनय , आवाजातील चढ उतार जबरदस्त होते. जीवनने साठ धार्मिक चित्रपटात नारदाचा रोल केला होता.कदाचित हा विक्रम असावा.  आज जीवनची आठवण होण्याचे एक कारण आहे.परवा शनिवारी ’मी मराठी’च्या एका अमेरीकेतील वाचकाचा फोन आला व ’आज जीवनच्या जन्म शताब्दीची सांगता होते आहे.’मी मराठी’त लेख कसा नाही’. अशी विचारणा झाली. एवढ्या मोठ्या कलावंताची शताब्दी कशी विसरली याचे वैषम्य वाटले. पण देर ही सही या न्यायाने या महान खलनायकाचे हे  स्मरण याचे श्रेय मात्र साता समुद्रापलीकडच्या त्या वाचकाला! (Untold stories)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor jeevan Amitabh Bachchan Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Classic movies Entertainment Indian Cinema praan sachin pilgoankar Shashi Kapoor untold stories
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.