Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Priya-Umesh यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी निवड झाली तरी कशी?

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

Bigg Boss 19 ची स्पर्धक Tanya Mittal घरात घेऊन गेली तब्बल

Tharal Tar Mag मालिकेतील अमित भानुशालीला बाप्पाने दिला खास आशीर्वाद;

अभिनेता संतोष जुवेकरने बाप्पाला घातल खास साकडं; म्हणाला,’ज्या गोष्टीची गरज आहे…’  

Lalbagcha Raja : ९१ वर्षांत पहिल्यांदाच राजासमोर लाईव्ह गाण्याची संधी

‘आवाज दे के हमे तुम बुलाओ…..’ हे गाणे Shammi Kapoor

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आगामी कपिल देव चित्रपटाच्या पार्टीला हा कोरोनाच्या आकाराची टोपी घालून अवतरेल…

 आगामी कपिल देव चित्रपटाच्या पार्टीला हा कोरोनाच्या आकाराची टोपी घालून अवतरेल…
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

आगामी कपिल देव चित्रपटाच्या पार्टीला हा कोरोनाच्या आकाराची टोपी घालून अवतरेल…

by सई बने 06/07/2020

मुंबईकर छोरा म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंह 6 जुलै रोजी पस्तीशीचा होतोय. बाजीराव मस्तानी, पदमावत, गलीबॉय सारख्या चित्रपटांनी बॉलीवूडमध्ये रणवीरनं आपलं स्थान पक्क केलंय. अभिनयात त्याचा कोणी हात धरु शकणार नाही, तसा चित्र विचित्र ड्रेस करण्यातही. कधी कुठल्या अवतारात तो येईल हे कोणीही सांगू शकत नाही…..
याचा काही भरवसा नाही….

फिल्मफेअर पुरस्काराच्या वेळी गिफ्ट रॅप करण्यासाठी वापर करतात तशा झिरमीळीत कागदासारख्या कपड्यात एक अभिनेता आला. ते कपडे म्हणजे जादूगार घालतात तसा मोठाला कोट, तशीच चकाकती पॅन्ट आणि वर टोपी. त्याचा हा अवतार पाहून बंदोबस्तासाठी असलेले पोलीसही स्वतःला रोखू शकले नाहीत. तेही पोट धरुन हसत होते. बाकींची अवस्थाही तशीच होती.  पण हा बंदा बिंनधास्त. त्याला काही वाटत नव्हतं.  तो तशाच अवतारात सगळीकडे फिरत होता. सगळ्याच्या नजरेतील त्याच्या बाबतीत असणा-या कुतूहलाची तो मजा घेत होता. त्याला जणू हेच अपेक्षित होते. हा असा चित्र विचित्र कपडे घालून बिंनधास्त वावरणारा अभिनेता कोण हे ओळखलंच असेल. तो आहे, सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह…

मुंबईकर असलेल्या सिंधी कुटुंबातील तरुणाने आपले स्वप्न पूर्ण केले. त्याला लहानपणापासून अभिनेता व्हायचं होतं. रणवीर सिंह भवनानी, हे त्याचं मूळ नाव. पण त्यातील भवनानी हे नाव काढून त्यानं बॉलिवूड स्टाईल नाव लावलं. रणवीर सिंह. हे भनवानी कुटुंब मूळ पाकिस्तानातील. फाळणीच्या वेळी हे कुटुंब मुंबईत आलं. आणि पक्क मुंबईकर झालं. त्याची आई आणि अनिल कपूरची पत्नी या बहिणी बहिणी. म्हणजे सोनम कपूरचा तो भाऊ. साहजिकच अभिनेत्यांचं जीवन तो जवळून पहात होता. त्यालाही अभिनेताच व्हायचं होतं. पण कॉलेजमध्ये गेल्यावर समजलं ते सहज साध्य नाही. त्यामुळे रणवीरनं लेखनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अमेरिकेतील इंडीयाना विद्यापीठात त्यानं कलाशाखेची पदवी संपादन केली. भारतात परत आल्यावर त्यांनी काही जाहीरातींसाठी कॉपीरायटींगचं काम केलं. पण त्याचं लहानपणीचं स्वप्न काही जात नव्हतं. त्यामुळं ऑडीशन द्यायला सुरुवात केली. 2010 मध्ये त्याला चक्क यश राज फिल्ममध्ये लॉटरी लागली. यशराज च्या नवीन चित्रपटासाठी फ्रेश चेहरा हवा होता. त्यासाठी नवीन तरुणांच्या ऑडीशन घेण्यात येत होत्या. त्यात या रणवीरनं बाजी मारली. त्याला बैंड बाजा बारात या चित्रपटात लिड रोल मिळाला. त्याची सहकलाकार होती, अनुष्का शर्मा. दिल्लीचा एक उद्योगी मुलगा. बिट्टू.. हा बिट्टू पहिल्याच चित्रपटात छा गया. त्याचा सहज अभिनय बाजी मारुन गेला. दिल्लीचा चुलबूला मुलगा.  त्यानं परफेक्ट केला. या पहिल्याच चित्रपटासाठी रणवीरला फिल्मफेअर मिळाला.
त्यानंतर रणवीर सिंह नावाचं बॉलिवूडचं मिटर चालू झालं. लेडीज वर्सेज रिक्की बहल, बॉम्बे टॉकीज, लुटेरा, रामलीला, गुंडे, किल दिल, हे ब्रो, दिल धडकने दो, बाजीराव मस्तानी, बेफिक्रे, पदमावत, सिंम्बा, गली बॉय असे एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट रणवीरनं दिले. प्रत्येक चित्रपट वेगळा.  आणि त्यासाठी रणवीरनं घेतलेली मेहनतही आणि त्याचा त्यातील लूक ही चर्चेचा विषय ठरला.

दिल धडकने दो मध्ये त्याने केलेला बेफीकीर वृत्तीचा कबीर मेहरा तरुणांना आपल्यासारखा वाटला. तर बाजीराव मस्तानी मध्ये त्याने पेशवा बाजीराव यांची भूमिका केली. या भूमिकेनं अंगावर रोमांच उभे राहीले. बाजीराव पेशवे यांची भूमिका साकारण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास करण्यासाठी रणवीर काही महिने सोशल मिडीयापासून दूर राहीला. त्यातील त्याच्या मिशांचा लूक गाजला. या भूमिकेसाठी त्याला दुस-यांदा फिल्मफेअर मिळाला. पदमावतमधील त्याच्या अल्लाउद्दीन खिलजीनं त्याच्या बद्दल चिड निर्माण झाली. ही भूमिका केल्यावर स्वतः रणवीरही काही दिवस अस्वस्थ होता, हे विशेष.

बॉलिवूडच्या या स्टारनं दिपिका पादुकोण या अभिनेत्रीबरोबर लग्न केलं. 2012 मध्ये रामलीला चित्रपटाच्या दरम्यान या दोघांमध्ये प्रेमाचा नवी कहाणी सरुवात झाली. त्यानंतर सहा वर्षानी दोघानी इटलीमध्ये लग्न करुन आपल्या प्रेमाला नवीन नात्यात बांधलं…

रणवीर आणि वाद यांचेही आगळे नाते राहिले आहे. एकतर त्याचे चित्र विचित्र कपडे. या त्याच्या स्टाईलवर अनेकवेळा सलमान आणि शहारुख खाननं त्याची टिंगलही केली. पण त्याला काही फरक पडला नाही. एका कार्यक्रमात तो चक्क स्कर्टसारखा ड्रेस घालून पोहचला होता. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी ट्रोल करत त्याला, कमीतकमी कपडे तर निट घाल रे बाबा. असा सल्ला दिला होता. पण हा सल्ला ऐकेल तर तो रणवीर कसला. दिल धडकने दो या चित्रपटाच्या पार्टीसाठी रणवीरने किसिंग टीशर्ट घातलं होतं.  तेव्हा त्याच्या चाहत्यांनीही डोक्यावर हात मारुन घेतला होता. कधी पिवळ्या, कधी गुलाबी, तर कधी फुला फुलांची डीझाईन असलेल्या कपड्यांमध्ये रणवीर कुठेही जाऊ शकतो. हाच तर त्याचा आत्मविश्वास त्याला आज बॉलिवूडमध्ये टॉपला घेऊन गेला आहे. सध्या तो कपिल देव यांच्यावरील चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त होता. लॉकडाऊननंतर या चित्रपटाचे प्रदर्शन होईल बहुधा. तेव्हा होणा-या पार्टीला हा स्टार कसा येईल हे सांगता येणार नाही. कदाचित आता हैराण करणा-या करोनाच्या आकाराची टोपी घालून तो आपल्यापुढे येईल. कारण याचा काही भरवसा नाही.

आगामी चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat Bollywood Topics bollywood update Celebrity Celebrity Birthday Celebrity News Entertainment Featured Indian Cinema
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.