Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
Siddharth Khirid अभिनेता सिद्धार्थ खिरीडने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली प्रेमाची जाहीर कबुली!
२०२४ हे वर्ष येत्या काही तासातच संपत असून, लवकरच आपण २०२५ या नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. आज या वर्षातला अखेरचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस खास करण्यासाठी किंवा हा खास दिवस अधिक संस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जणं काही ना काही स्पेशल या दिवशी करताना दिसत आहे. काही लोकं फिरायला जात आहे, तर काही लोकं लगीनगाठ बांधत आहे. (Siddhart Khirid)
२०२४ या वर्षातला शेवटचा दिवस खास करण्यासाठी मराठी मनोरंजनविश्वातल्या कलाकारांनी देखील अनेक गोष्टी केल्या किंबहुना करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी याबद्दल माहिती देखील दिली आहे. अशाच एका मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीबद्दल खुलासा केला आहे. (Latest Marathi Movies)
मराठी टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून सिद्धार्थ खिरीडला (Siddhart Khirid) ओळखले जाते. सिद्धार्थने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले असून, त्याला कमालीचा फॅन बेस आहे. याच सिद्धार्थने २०२४ वर्षातला शेवटचा दिवस अतिशय हटके पद्धतीने खास केला आहे. (Marathi Actor)
सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका अतिशय स्पेशल पोस्ट शेअर करत तो प्रेमात असल्याचे कबूल केले केले आहे. सिद्धार्थने दोन फोटोंसोबत ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “कॅप्शनमध्ये लिहिले की , फक्त २०२४ हे वर्ष संपत नाहीये तर, माझ्या आयुष्यातील सिंगल अध्याय सुद्धा आता संपलेला आहे. #endingsingleera.” (Entertainment mix masala)
याचाच अर्थ म्हणजे आता सिद्धार्थ सिंगल राहिलेला नाही तर तो रिलेशनशिपमध्ये आहे. २०२४ वर्षाचा शेवटचा दिवस सिद्धार्थसाठी खूपच खास झाला आहे. या पोस्टसोबत त्याने दोन अतिशय सुंदर रोमॅंटिक फोटो (Romatic Photo) शेअर केले आहेत.
सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो आणि त्याची गर्लफ्रेंड अतिशय रोमॅंटिक ठिकाणी दिसत आहे. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणी ते उभे असून, त्यांच्या मागे फुलांचे हार्टशेपमध्ये डेकोरेशन दिसत आहे. कदाचित सिद्धार्थने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले असेल तेव्हाच हा फोटो असावा. सिद्धार्थच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. (Celebrity News)
============
हे देखील वाचा : Pran : प्राण यांच्या हिंदी सिनेमातील प्रवेशाचा भन्नाट किस्सा!
============
मात्र त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा यात दाखवलेला नाही. त्यामुळे ही मुलगी कोण असावी याबद्दल आता अनेक तर्क लावले जात आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि त्याच्या फॅन्सने कमेंट्स करत त्याचे अभिनंदन केले आहे. सध्या चालू असणाऱ्या लग्नाच्या सीझनमध्ये लवकरच सिद्धार्थ देखील लग्नबंधनात अडकेल अशी अपेक्षा आहे.
सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने फ्रेशर्स व्यतिरिक्त मुलगी झाली हो , जाऊ बाई जोरात, हृदयी प्रीत जागते यांसारख्या बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.