
‘या’ मालिकेतील कलाकारांनी एका सीनसाठी केले तब्बल २४ तास नॉनस्टॉप शूटिंग !
मराठी छोट्या पडद्यावरच्या मालिका जितक्या मनोरंजक असतात, तितकेच त्यांच्या शूटिंगमधले किस्सेही तितकेच खास असतात. अनेक कलाकार सलग १२-१३ तास शूटिंग करत असल्याचं आपण ऐकलं आहे. पण यावेळी प्रेक्षकांच्या आवडत्या ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेनं तब्बल २४ तास नॉनस्टॉप शूटिंग करून एक वेगळाच अनुभव घेतला आहे. या मालिकेनं अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पहिल्या नजरेतल्या प्रेमाची ही कथा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावते आहे. आता या मालिकेत एक नवा आणि मोठा टप्पा सुरू होत आहे. तेजा आणि वैदहीच्या लग्नाचा! येत्या ५ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांना या लग्नसोहळ्याचा भव्य एपिसोड पाहायला मिळणार आहे.(Tujhyasathi Tujhyasang Serial)

कथानकानुसार, तेजाचा एक प्लॅन फसतो आणि तो चुकून वैदहीचं अपहरण करतो. या घटनेमुळे वैदहीच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं. माईसाहेबांच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना तेजाचं लग्न वैदहीसोबत लावून द्यावं लागतं. या लग्नामागे प्रत्येकाचाच आपला स्वार्थ दडलेला आहे. मात्र, तेजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण पहिल्या नजरेत जिच्या प्रेमात तो पडला, तिच्यासोबतच आता तो विवाहबंधनात अडकणार आहे.

वैदही मात्र या लग्नाला मनाविरुद्ध तयार होते. आपल्या बहिणीच्या भविष्यासाठी ती होकार देते. पण आता ती मक्तेदार कुटुंबाची सून म्हणून जेव्हा त्या घरात प्रवेश करेल, तेव्हा तिला असंख्य आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. माईसाहेब तिचा छळ करण्याचा प्रत्येक प्रयत्न करणार आहेत. अशावेळी वैदही त्यांना तितक्याच कठोर शब्दांत उत्तर देऊ शकेल का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे. या खास लग्नाबद्दल अभिनेत्री अनुष्का गीते (वैदही) म्हणाली, “तेजा-वैदहीच्या लग्नाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला. या लग्नामुळे मला सामूहिक विवाह सोहळ्याचा भन्नाट अनुभव मिळाला. सेटवर ४०-५० जोडपी पारंपरिक पोशाखात सजली होती. दोन दिवसांत नॉनस्टॉप २४ तास आम्ही लग्नाचं शूट पूर्ण केलं. कलाकार असो किंवा तांत्रिक मंडळी, सगळ्यांनीच एकमेकांची काळजी घेतली. माझा लूक अगदी ‘जोधा’ सारखा आहे, त्यामुळे हे लग्न मी खूप एन्जॉय केलं.”(Tujhyasathi Tujhyasang Serial)
=================================
=================================
आता लग्नानंतर वैदहीच्या आयुष्यात नवी आव्हानं सुरू होणार आहेत. तिच्या आणि तेजाच्या प्रेमकथेला पुढे कोणते वळण मिळणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एक मात्र नक्की ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका आता खरी रंगतदार टप्प्यात प्रवेश करत आहे.