Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Archana Joglekar : शूटिंगदरम्यान झाला बलात्काराचा प्रयत्न, हादरलेल्या अर्चना जोगळेकरांनी थेट इंडस्ट्रीच सोडली
सिनेसृष्टीत अभिनय करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या एका खास वैशिष्टयांबद्दल ओळखले जाते. प्रत्येक कलाकारांमध्ये एक खासियत असते. हीच खासियत या मंडळींची ओळख बनते. उदाहरण द्यायचे झाले तर, कोणी नृत्यामुळे, कोणी सौंदर्यामुळे, कोणी डोळ्यांमुळे, विनोदामुळे आदी अनेक गोष्टी या मंडळींची ओळख बनते. मात्र असे खूपच क्वचित घडते, की एकाच कलाकाराला त्याच्यात असणाऱ्या विविध गुणांमुळे, वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळते.(Entertainment News)
मराठी, हिंदी आणि उडिया चित्रपटविश्व गाजवणारी आणि आपल्या नितळ सौंदर्यामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना जोगळेकर. अर्चना जोगळेकर (Archana Joglekar) हे नाव उच्चरताच त्यांचे अनेक उत्तम सिनेमे सर्रकन डोळ्यासमोरून जातात. आपल्या सौंदर्यासोबतच लांबसडक केसांसाठी, नृत्यासाठी आणि आकर्षक डोळ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अर्चना सध्या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी त्यांच्या चर्चा आजही या सिनेविश्वात कायम होतात. (Archana Joglekar)

९० च्या दशकात जागतिक सुंदरी असलेल्या ऐश्वर्या रायला देखील सौंदर्याच्या बाबतीत अर्चना यांनी मागे टाकले होते. अर्चना यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र एक अशी घटना घडली ज्यामुळे अर्चना संपूर्णपणे हादरल्या आणि त्यांनी मनोरंजनविश्व तर सोडलेच सोबतच देश देखील सोडला आणि त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. मग त्यांच्यासोबत नक्की काय घडले होते, चला जाणून घेऊया. (Entertainment Mix Masla)
======
हे देखील वाचा : Milind Gawali : “माझ्या आईच्याच पोटी जन्माला यायचं….” मिलिंद गवळी यांनी व्यक्त केल्या आईबद्दलच्या भावना
======
अर्चना यांचा जन्म मुंबईत एका मराठी कुटुंबात झाला. त्यांची आई आशा जोगळेकर या प्रख्यात कथ्थक नृत्यविशारद होत्या. अर्चना यांनी त्यांच्या आईकडूनच कथ्थक नृत्यकलेचे धडे गिरवले. अर्चना या अभिनय आणि कथ्थक यात विशारद होत्या. सोबतच त्या अभ्यासातही हुशार होत्या. त्यांनी वकिलीची डबल डिग्री प्राप्त केली आहे. अर्चना यांचा अभिनयाचा प्रवास नाटकांमधून सुरु झाला. त्यानंतर मालिका आणि मग चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांचा मोर्चा वळवला. (Bollywood News)

अर्चना यांनी मराठीसोबतच हिंदी आणि उडिया भाषेतील चित्रपटांमध्ये भरपूर काम केले. रंगत संगत, एका पेक्षा एक, अनपेक्षित, निवडुंग यांसारख्या मराठी चित्रपटात तर मर्दानगी, बात है प्यार की, आग से खेलेंगे, स्त्री यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. यासोबतच त्यांनी बोगामुल या तामिळ चित्रपटात तर सुना चंदेई या ओडिशा चित्रपटात काम केले आहे. यासोबतच त्या ‘किस्सा शांती का’, ‘कर्णभूमी’ आणि ‘फूलवती’ सारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये देखील दिसल्या होत्या. (Archana Joglekar News)
यशाच्या शिखरावर असताना १९९७ सालाने मात्र त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. १९९७ साली एका विकृत माणसाने अर्चना यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. ३० नोव्हेंबर १९९७ साली अर्चना जेव्हा ओडिसा येथे एका चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी गेल्या होत्या. शूटिंगदरम्यान त्या पंथा निवास येथे राहत होत्या. एक दिवस रात्री तिथे भुबानानंदा पंडा नावाचा एक इसम गेला आणि अर्चना यांचा ऑटोग्राफ घेण्याच्या निमित्ताने त्याने त्यांच्या खोलीत शिरुन त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्चना यांनी कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी तक्रार नोंदवली. पुढे डिसेंबर १९९७ ला त्या माणसाला पकडण्यात आले. (Top News)

एप्रिल २०१० साली भुबानानंदा पंडाला १८ महिने कारावासाची शिक्षा भुवनेश्वर फास्ट ट्रॅक कोर्टाने सुनावली होती. या मोठ्या घटनेनंतर अर्चना संपूर्णपणे हादरल्या. या घटनेनंतर अर्चना यांचं पूर्ण आयुष्य बदललं. या धक्कादायक घटनेनंतर त्यांनी थेट इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. यशाच्या उच्च शिखरावर असताना अर्चना यांनी ही इंडस्ट्री सोडली आणि त्या अमेरिकेला शिफ्ट झाल्या. त्यांनी लग्न केले आणि आता त्या अमेरिकेमध्ये त्यांचे जीवन व्यतीत करत आहे. (Marathi Latest News)
======
हे देखील वाचा : Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
======
अर्चना यांचे नृत्यांवर सर्वात जास्त प्रेम होते. त्या अभिनयापासून लांब राहू शकत असल्या तरी नृत्याला त्या स्वतःपासून लांब ठेऊ शकत नव्हत्या. म्हणूनच अर्चना यांनी न्यू जर्सी येथे ‘अर्चना नृत्यालय’ सुरु केले असून, तिथे अनेक विद्यार्थ्यांना त्या कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देतात. अर्चना यांना सुर श्रृंगार समसाद यांच्याकडून ‘श्रृंगार मनी’ आणि हिंदी साहित्य परिषद यांच्याकडून ‘नृत्य भारती’ हा पुरस्कारही मिळाला आहे. (Bollywood Tadka)