Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रेक्षकांची लाडकी माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकरला मिळणार विठ्ठलाची साथ… 

 प्रेक्षकांची लाडकी माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकरला मिळणार विठ्ठलाची साथ… 
kalakruti-actress-divya-pugaonkars-vitthal-Maza-sobati-to-hit-the-screens-soon-times-marathi-info/
टीव्ही वाले मिक्स मसाला

प्रेक्षकांची लाडकी माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकरला मिळणार विठ्ठलाची साथ… 

by शुभांगी साळवे 17/06/2023

अभिनेत्री दिव्या पुगांवकर सध्या ‘विठ्ठल माझा सोबती’ असं म्हणत विठूरायाच्या आराधनेत रमली आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘विठ्ठल माझा सोबती’  या चित्रपटात विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका सोज्वळ मुलीच्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार आहे.  फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून संदीप मनोहर नवरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटाच्या निमित्ताने वारी न अनुभवता येणाऱ्या रसिकांना या चित्रपटाच्या रूपाने वारीचा सोहळा आणि लाडक्या विठूरायाच्या दर्शनाचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. ‘आषाढी एकादशी’चं औचित्य साधून २३ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रत्येक विठ्ठल भक्तांसाठी आनंदवारी असेल.(Divya Pugaonkar)

दिव्या सांगते, ‘विठ्ठलाला मानणारी ही व्यक्तिरेखा असून ‘विठ्ठल’ तिचा ‘सोबती’  बनून तिला कशाप्रकारे मदत करतो, हे दाखवतानाच भक्तीचा मार्ग तुम्हाला संकटातून तारून नेत असतो हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे. कुटुंबकलहाला कंटाळलेल्या भक्ताच्या आयुष्यात एक साधारण ‘विठ्ठल’ नामक मदतनीस येतो. ‘विठ्ठल’च्या येण्याने नेमकी काय जादू घडते? त्या भक्ताच्या घरातील सदस्यांमधील मतभेद दूर होतात का? हा ‘विठ्ठल’ नेमका आहे तरी कोण आणि कुठून आला?  याची हृदयस्पर्शी कथा ‘विठ्ठल माझा सोबती’ चित्रपटातून पहाता  येणार आहे. 

Divya Pugaonkar
Divya Pugaonkar

पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटात दिव्या पुगांवकरसह अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत.(Divya Pugaonkar)

==============================

हे देखील वाचा: अभिनेता सौरभ गोखले झळकणार ‘फौजी’च्या भूमिकेत

==============================

गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. मनू अस्थी संकलक तर चित्रपटाच्या छायांकनची जबाबदारी गौरव पोंक्षे यांनी सांभाळली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Divya Pugaonkar Entertainment Marathi Movie mulagi jhali ho serial Vitthal majha sobati
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.