अभिनेत्री Janhvi Kapoor शिखर पहारियासोबत तिरुपतीमध्ये लग्न बंधनात अडकणार?
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे चित्रपट आणि कामापेक्षा जास्त चर्चेत असते. जान्हवी कपूरच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जान्हवी कपूर आणि शिखर पहारीया रिलेशनशिपमध्ये आहेत. अलीकडेच अभिनेत्री अनेक इव्हेंट्समध्ये शिखर पहारीयाच्या निक नेम शिखूचा पेडंट परिधान करताना दिसली होती. मात्र, जान्हवी कपूरने आपल्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. हे नातं मात्र सगळ्यांनाच माहित आहे. दरम्यान, आता अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी आली होती, ज्यावर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.(Janhvi Kapoor On Tirupati Wedding)
जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत लग्न करणार असल्याची पोस्ट एका पॅपराझी पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिरुपती मंदिरात दोघे लग्न करणार असल्याचंही पोस्टमध्ये लिहिलं आहे. लग्नात जान्हवी कपूर गोल्डन साडी नेसणार आहे असही त्यात लिहीण्यात आलं आहे. जान्हवी कपूरच्या या पोस्टवर नजर पडली तेव्हा ती सत्य उघड करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. आणि तिने लगेचच या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, “काहीही.” असं लिहील आहे.
कॉफी विथ करणमध्ये जेव्हा अभिनेत्री तिचा भाऊ अर्जुन कपूरसोबत आली होती, त्यावेळी जेव्हा तिला लग्नाचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने मोठ्या प्रेमाने त्यात उत्तर दिले होते आणि ती म्हणाली होती की ‘माझ्या मनात लग्नाबद्दल सुरुवातीपासूनच स्पष्ट चित्र आहे. तिरुपतीमध्ये माझं लग्न होणार असून लग्नाला कुटुंबातील सदस्यच उपस्थित राहणार आहेत. मला माहित आहे की मी सोनेरी कांजीवरम साडी आणि केसांमध्ये भरपूर मोगरा माळणार आहे. माझे पती लुंगीत घालतील आणि आम्ही केळीच्या पानांवर जेवू, अस ती म्हणाली होती.
================================
================================
करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये जान्हवी आली तेव्हा तिने एका प्रकारे या नात्याला दुजोरा दिला होता. नुकताच तिला शिखू नावाचा नेकलेस परिधान केलेला चाहत्यांनी ही पाहिला होत. त्याचबरोबर अनेक पार्टी आणि मंदिरातही त्या दोघांना एकत्र पाहील गेलं आहे. जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे सध्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी‘ आहे. यासोबतच ती ‘एन्टेड‘ या चित्रपटात ही झळकणार आहे