Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Umesh Kamat-Priya Bapat यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग!

Bigg Boss Marathi 6: घरातून हकालपट्टीनंतर Divya Shinde ची पहिली प्रतिक्रिया;

R D Burman यांच्याकडील म. रफी यांचे शेवटचे गाणे!

Netflix India 2026 : ‘इक्का ते ‘फॅमेली बिझनेस’; जाणून घ्या

Bigg Boss Marathi 6: आता होणार अजून धिंगाणा! बिग बॉसच्या

Ranpati Shivray Swari Agra Review : शिवरायांवर आलेला सर्वात बेस्ट

Divya Shinde : बिग बॉसच्या घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची

Maharashtrachi Hasyajatra फेम Dattu More ची विनोदापाठोपाठ व्यवसायातही एंट्री; सुरु केलं

Gaurav More ने स्वतः सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचे कारण म्हणाला,’सुरुवातीला ते मजेशीर

संगीतकार ओ पी नय्यर आणि Mohammad Rafi यांच्यातील मतभेद कसे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

शिवानी सुर्वे झळकणार हिंदी सिनेमात,’अनलॉक जिंदगी’ लवकरच येणार भेटीला  

 शिवानी सुर्वे झळकणार हिंदी सिनेमात,’अनलॉक जिंदगी’ लवकरच येणार भेटीला  
kalakruti-actress-shivani-surves-hindi-movie-unlock-zindagi-hit-the-screens- soon-marathi-info/
मिक्स मसाला

शिवानी सुर्वे झळकणार हिंदी सिनेमात,’अनलॉक जिंदगी’ लवकरच येणार भेटीला  

by शुभांगी साळवे 27/04/2023

कोरोना महामारीने सर्वसामान्यांपासून अगदी श्रीमंतापर्यन सगळ्यांच आयुष्य थांबवल. या महामारीने कित्येकांच आयुष्य बदलवून टाकल तर कित्येकाच्या माणसांना कायमच संपवून टाकलं. आज ही त्या दिवसाच्या आठवणी नकोशा वाटतात. कोरोना, लोकडाउन हे सगळ संपल असल तरीही आज ही त्याची भीती अनेकांच्या मनात कायम आहे. हीच परिस्थिती आता आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे ‘अनलॉक जिंदगी’ या हिंदी चित्रपटातून. ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या सह प्रमुख मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे सुद्धा महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत.(Shivani Surve)

Shivani Surve
Shivani Surve

लॅाकडाऊनच्या काळात एकमेकांशी संपर्क साधणे कठीण होते, इतकेच काय रक्ताची नातीही या काळात नकळत दुरावत होती. अंगावर काटा आणणाऱ्या या भयाण वास्तवाचे चित्रण या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही नकारात्मक बाजू दिसत असल्या तरी या काळात काही सकारात्मक बदलही माणसात घडत होते. अनेकांची विचारसरणी बदलत होती, नात्यांचे महत्व उमगत होते. या जमेच्या बाजूही या चित्रपटात दिसणार आहेत, या सिनेमाच्या पोस्टरमध्ये एक मुलगी आईचे सांत्वन करताना दिसत असून एक ॲम्बुलन्सही दिसत आहे. तर बाजूला दोन व्यक्ती हताश होऊन बसलेले दिसत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा काय अर्थ आहे, याचे उत्तर आपल्यला १९ मे रोजी मिळणार आहे.

Shivani Surve
Shivani Surve

”कोरोना महामारी हे देशावर आलेले सर्वात मोठे संकट होते, लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. या परिस्थतीशी जुळवून घेतानाच कुठेतरी नात्यांचे महत्व ही यात अधोरेखित करण्यात आले आहे. माणसामाणसांमध्ये झालेले सकारात्मक बदलांचे दर्शन या चित्रपटामध्ये घडेल. ‘अनलॅाक जिंदगी’ पाहताना प्रेक्षकांना कुठेतरी या परिस्थितीचा सामना आपणही केल्याचे जाणवेल. अगदी तुमच्या आमच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे.” अशा भावना दिग्दर्शक आणि निर्माते राजेश गुप्ता यांनी या सिनेमबाबत व्यक्त केल्या.(Shivani Surve)

=================================

(हे देखील वाचा: Ankita Lokhande झाली बेरोजगार? स्वतः सांगितलं काम न मिळण्याचे कारण…)

=================================

या सिनेमाच्या निमित्ताने शिवानी सुर्वे हिंदी सिनेमात झळकणार आहे. बिग बॉस च्या सीजन मध्ये झळकल्यानंतर शिवनीच्या चाहत्या वर्गात मोठी वाढ झाली आहे, ती सोशल मिडीयाच्या मध्यमातूनही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वीच शिवानी सुर्वेचा वाळवी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, आणि या सिनेमाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आता शिवानी हिंदी सिनेमातून प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.   

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Shivani Surve Bollywood bollywood update marathi actress shivani surve unlock zindagi unlock zindagi hindi movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.