Supriya Pathak वाढदिवस खास मनोरंजनविश्वातील अष्टपैलू अभिनेत्री -सुप्रिया पाठक
चित्रपटविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका न निभावता देखील आपल्या अभिनयाने आणि प्रतिभेने आपली ओळख तयार केली.आजच्या काळात फक्त मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाच ग्लॅमर आणि ओळख मिळते. मात्र असे देखील कलाकार या क्षेत्रात आहेत, ज्यांनी केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर मोजक्या मात्र चांगल्या कामातून प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे. (Bollywood News)
अशाच एक अतिशय दिग्गज, सुंदर आणि प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठक (Supriya Pathak). अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सुप्रिया आज त्यांचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुप्रिया यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या आईच्या भूमिका सर्वात जास्त गाजतात. (Supriya Pathak Birthday)
‘खिचडी’मध्ये (Khichadi) सुप्रिया यांनी साकारलेली ‘हंसा‘ (Hansa) आजही सगळ्यांच्या लक्षात आहे, आणि कायम राहील. या विनोदी भूमिकेने सुप्रिया यांना न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळवून दिली. आज सुप्रिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास बाबी. (Ankahi Baatein)
सुप्रिया पाठक यांचा जन्म ७ जानेवारी १९६१ रोजी मुंबईमध्ये झाला. सुप्रिया यांच्या आई दीना पाठक (Dina Pathak) या हिंदी आणि गुजराती मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर त्यांचे वडील बलदेव (Baldev) हे कला क्षेत्रातील सुपरस्टार राजेश खन्ना, दिलीप कुमार यांचे ड्रेसमेकर होते. सुप्रिया यांना आईकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला. मुंबईत शालेली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे त्यांचा मोर्चा वळवला. सुप्रिया यांची मोठी बहीण रत्ना पाठक चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. (Entertainment mix masala)
दिसायला सामान्य असलेल्या सुप्रिया पाठक यांनी आपल्या प्रतिभेच्या कोणावर या ग्लॅमर जगतात नावलौकिक मिळवला. त्यांनी त्यांच्या अष्टपैलू अभिनयाने प्रत्येक जॉनरच्या भूमिका उत्तम पद्धतीने वठवल्या आणि त्या गाजल्या देखील.
गुजराती नाटक ‘मैना गुर्जरी’ यातून सुप्रिया पाठक यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. या नाटकाचे दिग्दर्शन दीना पाठक अर्थात सुप्रिया यांच्या आईनेच केले होते. नाटक करत असताना त्यांनी १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलियुग’ सिनेमात ‘सुभद्रा’ ही भूमिका साकारली आणि सुप्रिया यांनी हिंदी सिनेसृष्टीमधे प्रवेश केला. हा चित्रपट महाभारताचे रूपांतर होता. या भूमिकेसाठी सुप्रिया पाठक यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता.
हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी प्रवेश झाल्यानंतर त्यांनी ‘मासूम’, ‘मिर्च मसाला’, ‘राख’ या चित्रपटांमध्ये देखील त्या दिसल्या. या काळात त्यांनी फ्रेंच चित्रपट ‘द बंगाली नाईट’ या चित्रपटात त्यांनी काम केले.
चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख तयार केल्यानंतर सुप्रिया यांनी २००२ साली त्यांच्या मोर्चा टीव्ही मालिकांमध्ये वळवला. त्यांनी ‘खिचडी’ या विनोदी मालिकेत ‘हंसा भाभी’ ही भूमिका साकारली. ही मालिका आणि सुप्रिया यांची ‘हंसा’ ही भूमिका अफाट गाजली. त्यांना हाना ही नवीनच ओळख प्रेक्षकांनी दिली. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. (Bollywood Masala)
या मालिकेसोबतच ‘बा बहू बेबी’, ‘एक महाल हो सपनो का’ या सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केले.पुढे त्यांना प्रेक्षकांनी ‘टेलिव्हिजन कॉमेडी क्वीन’ ही नवीन ओळख दिली. कॉमेडीमध्ये नाव कमवल्यानंतर २०१३ साली प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित रामलीला या सिनेमात त्यांनी ‘धनकोर’ ही ग्रे शेडची भूमिका साकारत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
वयाच्या २२ व्या वर्षी सुप्रिया पाठक यांनी त्यांच्या आईच्या मैत्रीणीच्या मुलाशी प्रेम विवाह केला. त्यांनी अतिशय घाईमध्ये हे लग्न केले आणि तितक्याच घाईमध्ये हे लग्न तुटले देखील. लग्नाला जेमतेम आठवडा उलटल्यानंतर त्यांना लग्नाचा पश्चाताप होऊ लागला. लग्नाच्या वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला
पुढे सुप्रिया एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी भटिंडा येथे गेल्या होत्या तेव्हा त्यांची भेट पंकज कपूर यांच्याशी झाली. तेव्हा पंकज आणि नीलिमा यांचे लग्न देखील तुटले होते. सुप्रिया आणि पंकज या काळात जवळ आले आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर पंकज आणि सुप्रिया पाठक जवळपास २ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचे लग्न झाले. पंकज आणि सुप्रिया यांना सना आणि रूहान ही दोन मुले आहेत. (Supriya Pathak and Pankaj Kapoor)